शिरूर तालुक्यातील 14 जणांचा अहवाल हाती...

शिरूर, ता. 19 मे 2020: कारेगाव (ता. शिरूर) येथील होम क्वारंटाईन केलेल्या 14 जणांचे स्वँब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व जणांचा स्वँबचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती आरोग्य सेविका डाँ. एस. बी. राऊत यांनी दिली. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

कारेगाव येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीसह रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना उधान आले होते व भितीचे वातावरण निर्माण झाले होते. माञ, या क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत सहकार्य करावे व लाँकडाऊन चे पालन करावे, असे आवाहन सरपंच अनिल नवले यांनी केले आहे.

शिरूर येथील बाबूराव नगर जवळील खासगी हॉस्पिटल येथील डॉक्टरसह 14 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अहवाल हाती आला असून, तो निगेटिव्ह आल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले. यामुळे हॉस्पिटलमधील कर्मचारी आनंदित झाला आहे. आणखी चार जणांचे कोरोना तपासणीसाठी नमुने उशिरा गेल्याने त्याचा अहवाल येणे बाकी आहे. परंतु, या अहवालामुळे शिरुर शहराला दिलासा मिळाला आहे.


दरम्यान, १९ मे ते २३ मे या कालावधीत रांजणगाव गणपती गाव शंभर टक्के लाँकडाऊन करण्यात येणार आहे. याबाबत परिपत्रक जाहिर करण्यात आले आहे, असे सरपंच सर्जेराव खेडकर यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या