कवठे येमाई येथे ३ जण कोरोना पॉझिटिव्ह...

No photo description available.
टाकळी हाजी, ता. १९ मे २०२० (प्रतिनिधी): शिरुर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन ग्रामीण भागात अनेक अफवांना पेव फुटत आहे.कवठे येमाई(ता.शिरुर) येथे मुंबई येथील घाटकोपर परीसरातून गावात आलेल्या एकाच कुटुंबातील ४ व्यक्तींपैकी ३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती शिरुरचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. हे कुटुंबीय मुंबई वरुन आलेले असल्याने त्यांचा इतर स्थानिक नागरीकांशी जास्त संबंध आलेला नाही.परंतु त्यांना मुंबईवरुन आणणारा (साकोरी ता. जुन्नर) येथील जावई मात्र कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे.


या कोरोना बाधित आजी-आजोबांचा मुलगा हा मुंबई येथे चालक असुन त्याला कोरोनोची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही चाचणीसाठी आरोग्य विभागाने मुंबईतच ताब्यात घेतले. त्यामुळे घरामधे राहणाऱ्या दोन मुली व आजी-आजोबा रात्रीच जावयाला सोबत घेऊन शिरुर तालुक्यातील आपल्या कवठे येमाई या मुळगावी आले. गावात ही वार्ता समजताच जागरुक ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना क्वारंटाईन केले. मात्र नंतर संशय आल्याने रविवारी औंध येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या कुटुंबातील चौघांपैकी आजी आजोबा व एका मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तसेच त्यांना सोडविण्यास आलेल्या जावयाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे कवठे येमाई परीसरात खळबळ उडाली आहे.याबाबत वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार की ४-५ दिवसापूर्वी मुंबई वरुन ४ जण कवठे येमाई येथे आल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर तातडीने त्यांना कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने  क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु अधिक चौकशी केली असता मुंबई येथे त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळून त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजल्यावर या ४ जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ४ पैकी ३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे कवठे यमाई परिसर सील करण्यात आला असून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी केले आहे.


याबाबत तहसिलदार लैला शेख यांनी तत्काळ प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. सध्या लॉक-डाऊन शिथिल झाल्याचा फायदा घेऊन मुंबई मधुन मोठ्या प्रमाणात लोक प्रशासनाचा डोळा चुकवुन रात्री-अपरात्री गावाला कोणतीही परवानगी न घेता येत आहेत.तसेच प्रशासनाला सुद्धा माहीती देत नाहीत. त्यामुळे समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. ४ दिवसांपुर्वी टाकळी हाजी मध्येही १२ जण मुंबईमधुन दाखल झाले. त्यांना तत्काळ ग्रामसेवक राजेश खराडे यांनी क्वांरटाईन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या