कारेगाव येथील ८० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

Image may contain: plant
रांजणगाव गणपती, ता. २१ मे २०२० (प्रतिनिधी): कारेगाव (ता.शिरुर) येथील  ८० वर्षीय कोरोना बाधित वृद्ध महिलेवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवार (दि २०) रोजी अखेर करोना संसर्गाने निधन झाल्याची माहिती शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली.तसेच या वृद्ध महिलेच्या १४ नातेवाईकांचा कोरोना अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे.

९ तारखेला या वृद्ध महिलेला शिरुर जवळील बाबुराव नगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर १० तारखेला नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर १३ तारखेला या महिलेला पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे संशय आल्याने या महिलेची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात या वृद्ध महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पुणे येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना काल (दि २०) रोजी या वृद्ध महिलेचे निधन झाले.


या वृद्ध महिलेच्या १४ नातेवाईकांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. या महिलेला सर्वप्रथम शिरुर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरसह १८ कर्मचारी आणि ५ रुग्ण अश्या २३ जणाचे अहवालही निगेटिव्ह आले होते. यामुळे कारेगाव, शिरुर तसेच शिरुरच्या परीसरातील सर्वजण सुरक्षित आहेत.


तर ही वृद्ध महिला राहत असलेला कारेगाव येथील काही परिसर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी "कंटेनमेंट झोन" म्हणून जाहीर करुन प्रतिबंधित केला आहे. या वृद्ध महिलेला नक्की कोरोना संसर्ग कुठे झाला, याबाबत ठोस माहिती मिळाली नसून हा संसर्ग हॉस्पिटलमध्येच झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या