निर्वी अपघात प्रकरण; दोषींवर कारवाई कधी...?

Image may contain: text
शिरुर, ता. २३ मे २०२० (प्रतिनिधी) : २८ एप्रिल रोजी निर्वी येथील बापु कुलथे (वय ६०) या व्यक्तीला गावातील मुख्य चौकात अंदाजे सायंकाळी ७ च्या सुमारास चारचाकी गाडीने जोरदार धडक देऊन चालक गाडीसहीत फरार झाला होता. या अपघातात बापु कुलथे यांचा जागीच मृत्यू झाला होता.त्यानंतर बापु कुलथे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच संशयास्पदरीत्या त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. या वेळेस गावातील काही राजकीय पुढारी तसेच कुलथे यांचे काही नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु  www.shirurtaluka.com ने या गोष्टीची दखल घेत वृत्त प्रसारीत केले होते.


या गोष्टीचे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर चालक गाडीसह पोलीस ठाण्यात हजर झाला होता. या गोष्टीला जवळपास एक महीना पुर्ण होत आला तरीही पोलिसांनी मात्र अजुनही कोणावर गुन्हा दाखल केलेला नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस "तारीख पे तारीख" पुढे ढकलत असुन पोलिस या प्रकरणात वेळकाढुपणाची भुमिका का...? घेत आहेत असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कोरोनाचे कारण पुढे करत या प्रकरणाचा तपास संथ गतीने चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे निर्वी ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असुन बापु कुलथे यांना नक्की न्याय मिळणार का...? तसेच हा अपघात होता की घातपात...? अशी चर्चा दबक्या आवाजात निर्वी गावात सुरु आहे.


शिरुर पोलीस ठाण्यात सिंघम अधिकाऱ्याची गरज...?
याबाबत शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाचा तपास अजुन पुर्ण झाला नसल्याचे www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.अपघाताच्या घटनेला जवळपास एक महीना होत आला. तसेच अपघात करणारा चालक गाडीसहीत स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालाय तरीही पोलिसांनी अजूनही संबंधित व्यक्तीवर गुन्हा का दाखल केला नाही. या प्रकरणात पोलिसांनी नक्की कोणत्या प्रकारची "तडजोड" केली हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.त्यामुळे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालुन बापु कुलथे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या