राजेंद्र रणजित जगदाळे (पाटील)

नाव : राजेंद्र रणजित जगदाळे (पाटील)
पत्ता : करडे, ता. शिरुर, जि. पुणे
जन्मतारीख : 23 जानेवारी 1975
मो. नं :  ९८५०३९५५५५
इमेल : rajendrajagdale9292@gmail.com
शिक्षण : १२ वी
आवड : समाजसेवा
व्यवसाय : शेती, उद्योग
पद : जिल्हा परिषद सदस्य
         आदर्श सरपंच, करडे


सविस्तर माहिती :
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातच जन्म झालेला असल्याने लहानपणापासुनच सामाजिकतेची आवड निर्माण झालेली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सर्व प्रश्नांची बारकाईने जाण आहे. शेती सांभाळून उद्योग व्यवसायाकडे वळलो. यात यश मिळत गेले. परंतु तरीही समाजासाठी काय करायचे याचाच नेहमी ध्यास असायचा. त्यातुनच २००९ साली गाव पातळीवर सर्व ग्रामस्थांच्या आशिर्वादाने व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचे सोने करत अनेकांना वेळोवेळी न्याय देण्याचा प्रयत्न केला. गरजू अपंग व वंचितांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. त्या कामांमुळेच सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

ग्रामस्थांनी दाखविलेल्या प्रेमाला सार्थ ठरवत गावचा चेहरामोहरा बदलवता आला. अनेक लोकहिताची कामे करता आली. गावची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण करता आली. यामुळे अनेक गोरगरिब जनतेपर्यंत पोहोचता आले. हळूहळू जनतेने ही आपलेसे केले. समाजसेवेची आवड असल्याने तो छंदच बनला. शिरुरचे माजी आमदार अशोक पवार व राजेंद्र जासुद यांच्यामुळे राजकारणात पुन्हा सर्वसामान्यांसाठी काम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सदस्य म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे. आगामी काळात महिलांसाठी सक्षमीकरण, तरुणांचे प्रश्न व वंचित घटकांना प्राधान्याने न्याय दयायचा प्रयत्न केला जाणार आहे.
Comment Box is loading comments...

संबंधित लेख

  • 1