श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट

महागणपती रांजणगाव
महागणपतीची पौराणीक कथा

त्रिपुरासुराचा जन्म :
फार प्राचीन काळी त्रैतायुगात गॄत्समद नावाचा एक थोर ज्ञानी होऊन गेला. 'गणाना त्वाम गणपती' या मंत्राची रचना गॄत्समदाने केली होती. त्यामुळे या मंत्राच्या जपाच्या आधी गॄत्समद ऋषीचे नाव घेतले जाऊ लागले. एके दिवशी गॄत्समद ऋषींना मोठी शिंक आली आणि त्यांच्या शिंकेतून एक जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंगाचा मुलगा बाहेर पडला. गॄत्समदऋषींनी या मुलास आपला पुत्र मानले. 'मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून इंद्रासही जिकेन' असे तो मुलगा गॄत्समदऋषींना म्हणाला तेंव्हा गॄत्समद ऋषींनी त्यास 'गणांना त्वाम' या गणेशमंत्राचा उपदेश केला. पित्याने दिलेल्या मंत्राप्रमाणे त्या बालकाने पाच हजार वर्षे खडतर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशाने त्याला प्रचंड सामथ्र्याचा वर दिला. त्याचप्रमाणे गजाननाने त्याला लोखंड, रूपे व सुवर्णाची नगरे दिली. 'तुझ्याकडे असलेल्या तीन नगरांमुळे तुला त्रिपुर हे नाव प्राप्त होर्इल.

त्रिपुरासुराचा उन्माद :
एका शंकरावाचून तुझा पराभव कोणीही करणार नाही. तू या लोकी अनेक सुखे उपभोगल्यावर शिवशंकर एकाच बाणाने तुझ्या या त्रिपुरांचा नाश करेल व तुलाही मुक्ती मिळेल' असा वर विनायकाने दिला.  गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्याला हैराण करून सोडले. त्याने प्रथम मॄत्यूलोक पादाक्रांत केला. नंतर इंद्राचा पराभव करून स्वर्गाचे राज्य घेतले त्रिपुरासुराच्या भयाने ब्र्र्र्र्र्रम्हदेव कमळात लपले व विष्णु क्षीरसागरात दडले. त्रिपुराने चंड व प्रचंड असे दोन मानसपुत्र उत्पन्न केले आणि एकाला ब्रम्हलोकाचे व एकाला विष्णूलोकाचे राज्य दिले.

नंतर कैलासपाशी जाऊन त्याने आपल्या बाहूने तो सर्व पर्वत हलवला. त्याचा हा पराक्रम पाहून शिवशंकर आनंदित झाले.त्रिपुरासुरास वर मागावयाला सांगितले. कैलासापाशी कैलास पर्वत मागितला. शंकराने आपले कैलासावरील स्थान त्या दैत्याला दिले आणि आपण मंदार पर्वतावर निघून गेले.

पॄथ्वीवर आलेल्या त्रिपुराच्या भीमकाय नामक सेनापतीने पॄथ्वीवरील सर्व राज्यांपासून खंडणी घेतली. तेथे चाललेली देवकॄत्ये बंद पाडली. त्रिपुराच्या पाताळात गेलेल्या वज्रद्रंष्ट सेनापतीने सर्व नागांचा पराभव केला. अशा प्रकारे त्रिपुरासुर त्रिभुवनांचे राज्य करू लागला.

गजाननास प्रार्थना :        
आपल्या पराभवामुळे गिरीकंदरी लपून बसलेले इंद्र्रासह सर्व देव त्रिपुराच्या वधाविषयी विचार करत असता नारदमुनी तेथे प्रकट झाले व म्हणाले 'त्रिपुराने हजारो वर्षे गजाननाची तपश्चर्या केली म्हणून त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तेंव्हा तुम्ही सर्वजण गजाननाची तपश्चर्या करून त्याला प्रसन्न करून घ्या'. असे सांगून नारदमुनींनी सर्व देवास एकाक्षर मंत्राचा उपदेश केला नंतर सर्व देव गणपतीची तपश्चर्या करू लागले. त्यांची निस्सीम तपश्चर्या पाहून गजानन प्रगट झाले. तेव्हा देवांनी गजाननाची आठ श्लोकांनी (प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रम विनायकम) स्तुती केली.संकटाचे निवारण होण्यासाठी देवांनी ही स्तुती केली म्हणून त्या अष्टश्लोकी स्तोत्राला 'संकटनाशनम गणपती स्तोत्रम' असे नाव प्राप्त झाले. जो कोणी दिवसातून तीन वेळा भक्तीयुक्त अंतकरणाने त्या स्तोत्राचा पाठ करील त्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या संकटाची पीडा होणार नाही असा प्रत्यक्ष गणपतीने या स्तोत्रास वर दिला आहे.

गजाननाचे कलाधराचे रूप :

देवास आश्वासन दिल्यावर ब्राम्हणाचे रूप घेऊन गजानन त्रिपुराकडे गेला व म्हणाला राजा मी एक ब्राम्हण असून चौसष्ट कलांचा अभ्यास केला आहे. म्हणून मला ‘कलाधर’ असे म्हणतात. तुझी किर्ती ऐकून तुझ्या दर्शनास आलो आहे. तेंव्हा त्रिपुरासुर म्हणाला 'हे कलाधरा तू तूझी कला दाखव. तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुध्दा देर्इन'

कलाधर म्हणाला, 'हे राजन, मी तुला तीन उत्तम प्रकारची विमाने करून देतो त्या विमानातून तुला एका क्षणात वाटेल तिथे जाता येर्इल व जे काय मनात आणशील ते तुला प्राप्त होर्इल तसेच एका शंकराशिवाय कोणालाही त्या विमानाचा भेद करता येणार नाही ज्यावेळी शंकर एका बाणाने त्या तीन विमानांचा भेद करेल तेंव्हा तुझाही नाश होर्इल' नंतर कलाधराने उत्तम प्रकारची तीन विमाने तयार केली ती विमाने पाहून त्रिपुराला फार आनंद झाला व त्याने त्या कलाधरास काय पाहिजे ते मागावयास सांगितले तेव्हा कलाधराने कैलास पर्वतावरील गजाननाची चिंतामणी नावाची मूर्ती त्रिपुरासुराकडे मागितली.

कलाधराची मागणी त्रिपुरासुरास अत्यंत तुच्छ वाटली, त्याने आपला दूत शंकराकडे पाठवला आणि उन्मत्तपणे चिंतामणी मूर्तीची मागणी केली, चिंतामणीची मूर्ती तुझ्यासारख्या उन्मत्त पुरूषास जन्मजन्मंतरीही लाभणार नाही, असा उलटा निरोप शंकराने त्रिपुरासुरास पाठवताच त्रिपुरासुर क्रोधित झाला व त्याने तत्काळ चतुरंग सेना एकत्रित करून मंदार पर्वतावर स्वारी केली.

शंकर आणि त्रिपुरासुर याच्यांत तुंबळ युध्द सुरू झाले. त्रिपुरासुराने शंकराच्या सर्व सैन्याचा फन्ना उडवला आणि शेवटी फक्त शिवशंकर युध्दभुमीवर उरले. एकटयाने युध्द करून जय मिळणार नाही, असे वाटुन शिवशंकर युध्दभुमी सोडून गिरीकंदरात लपून बसले. शंकराचा पराभव झाल्याचे समजताच पार्वती मंदार पर्वत सोडून आपला पिता हिमालय याला शरण गेली. विजय प्राप्त झाल्यावर त्रिपुरासुर मंदार पर्वतावर आला असता तेथे त्याला सहस्त्र सूर्याप्रमाणे तेजस्वी चिंतामणीची मूर्ती सापडली. ती घेऊन त्रिपुरासुर मोठया आनंदाने परतत असताना त्याच्या हातातील मूर्ती अचानक नाहीशी  झाली. मूर्ती नाहीशी झाली हा अपशकुन समजून त्रिपुरासुर दु:खी झाला.

भगवान शंकरांकडून त्रिपुरासुराचा वध :
देवांचा पराभव झाल्यामुळे त्रैलोक्यात अधर्म सुरू झाला व यज्ञयागादी कर्म बंद पडली. हा प्रकार पाहून शंकर इतर देवांसह त्रिपुरासुराच्या नाशाचा उपाय योजू लागले. तेव्हा नारदमुनी प्रगट होऊन शंकरास म्हणाले 'महादेवा, युध्दास जातेवेळी तू प्रथम गजाननाचे पूजन केले नाहीस म्हणून तुला जय मिळाला नाही, त्यासाठी आधी गणपतीची आराधना कर त्याला प्रसन्न कर आणि मग युध्दास जा म्हणजे तुला जय मिळेल', शंकरास नारदमुनींचे म्हणणे पटले आणि दंडकारण्यात जाऊन शंकराने गजाननाची षडाक्षर मंत्रानी आराधना केली. त्यावेळी शंकराच्या मुखातून एक दिव्य पुरूष उत्पन्न झाला व शंकरास म्हणाले, 'मीच गजानन आहे, मीच सॄष्टीचे पालनपोषन करतो, मी तुजवर प्रसन्न झालो आहे, तुला जे जे वर पाहिजे असतील ते ते मागुन घे' गजाननाचे भाषण ऐकून शंकरास आनंद झाला व त्याने गजाननाची स्तुती केली स्तुती ऐकुन गजानन म्हणाले 'शंकरा, माझ्या बीजमंत्राचा जप करूण एक बाण अभिमंत्रित कर तो बाण तू त्या राक्षसांच्या पुरांवर सोडलास म्हणजे त्याची तिन्ही पुरे एकदम नष्ट होतील, मग तू त्याचे सहज भस्म करशील', असे बोलत गणपतीने शंकराला आपले सहस्त्रनाम सांगितले, त्या सहस्त्रनामाचा जप केला असता कोणत्याही कार्यात जय होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात, गजाननाकडून वर मिळाल्यावर शंकरास आनंद झाला.

गजाननाच्या वरप्राप्तीनंतर शंकराने सर्व देवांस युदधास बोलावले. त्रिपुरासुराचे व शंकराचे तुंबळ युध्द सुरू झाले. त्रिपुरासुराच्या नाशासाठी शंकराने पॄथ्वीचा रथ केला चंद्र सुर्याची चाके लावली. ब्राम्हदेवाला सारथी विष्णूचा बाण आणि अश्विनीकुमारांना घेाडे केले एकाक्षर व षडाक्षर मंत्राच्या जपाने धनुष्य व बाण अभिमंत्रित केले नंतर धनुष्यास बाण लावून तो कणापर्यंत ओढून सोडला. तेंव्हा त्रिभुवनात एकदम विजेसारखा लख्ख प्रकाश पडला त्रिपुराला मूच्र्छा येऊन तो खाली पडला आणि असुराच्या तिन्ही पुरांचे भस्म झाले. त्रिपुराच्या शरीरातून एक ज्योती निर्मान होऊन तिने शंकराच्या शरिरात प्रवेश केला व त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली त्या दिवसापासुन शंकराला त्रिपुरारी हे नाव प्राप्त झाले ही घटना कार्तिक शुध्द पौर्णिमेला क्षेत्र भिमाशंकर येथे घडली म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात.

मणिपूरचे रांजणगाव महागणपती :
भगवान शंकराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यासाठी युध्दापुर्वी श्री गणेशाची पार्थिव मूर्ति ज्या गावी स्थापन करून श्री गणेशाची घोर तपश्चर्या केल्याने श्री गणेशाने प्रसन्न होऊन दहा तोंड व वीस हात (शस्त्रासह) असे महाकाय विराट दर्शन भगवान शंकराला दिले व त्रिपुरासुर राक्षसाचा वध करण्यासाठी एकाक्षर मंत्र देऊ केला, तेच ठिकाण मणिपूर. जे आज श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती म्हणुन ओळखले जाऊ लागले. तेव्हा पासुन या गणपतीस महागणपती संबोधण्यात येते.

ऐतिहासिक महत्व
महागणपती मंदिर हे 400 वर्षापुर्वीचे असून त्याच्या दगडी गाभाऱयाचे काम पेशवार्इ मध्ये झाले असून सवार्इ माधराव पेशवे यांनी हे बांधकाम केले आहे. मंदिराचे उजव्या बाजुला दगडी ओवऱया श्रीमंत पेशव्याचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी बांधलेल्या आहेत व लाकडी मंडपाचे काम इंदुर येथील सरदार किबे यांनी केले आहे. मंदिरासमोर दगडी नगारखाना व दगडी सरदार वेश व मंदिराच्या पुढे दगडी दीपमाळा प्राचीन वास्तूची आठवण करून देते.

महागणपतीचे मंदिर व मुर्ती
मंदिर पुणे-नगर मुख्य रस्त्यालगतच आहे आणि पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे महाव्दार भव्य प्रेक्षणीय आहे. आतील प्रवेशव्दारावर जयविजय नावाचे भव्य व्दारपाल आहेत. प्रवेशव्दाराच्या इमारतीवर पेशवेकालीन नगारखाना आहे.

प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पेशवेकालीन बांधणीचे मुख्य देवालय दिसते. मंदीरातील मूर्ती पूर्वाभिमूख असून डाव्या सोंडेची आणि आसन मांडी घातलेली आहे मूर्तीचे कपाळ रूंद आहे, दोन्ही बाजूंना रिध्दी सिध्दी उभ्या आहेत. मंदिरातील श्रीं ची पुजा देव कुटूंबीयांमार्फत केली जाते.

धार्मिक महत्व
नवसाला पावणारा महागणपती
अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. आजपर्यंत अनेक भाविकांच्या कुटूंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकटे महागणपतीच्या कॄपाप्रसादाने दूर झाल्याचे भाविक सांगतात. महागणपतीच्या दर्शनाने संकटे दूर होतात, अडचणीमधून मार्ग निघतात म्हणून भाविकांची 12 महिने याठिकाणी गर्दी असते. हे स्वयंभू स्थान असल्यामुळे रांजणगाव येथे कोठेही गणेशमुर्ती बसविली जात नाही. एक गाव एक गणपती हे या ठिकाणी अनेक शतके आहे. महागणपतीच्या चार दिशांना श्री देवीची मंदिरे असून भाद्रपद व माघ उत्सवात या ठिकाणी आणवाणी पायीव्दार यात्रा करण्याची परंपरा आहे. या चारी देवी महागणपतीच्या बहिणी असून उत्सवात या ठिकाणी देवस्थानतर्फे पुजा अर्चा केली जाते.

श्रीं चे मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम
1. श्रीं चे मंदिरातील नगारा वादन   : पहाटे 4.45 वाजता
2. श्रीं चे मंदिर उघडण्याची वेळ   : पहाटे 5.00 वाजता
3. श्रीं ची षोडशोपचार पुजा व पंचामॄत अभिषेक  : पहाटे 5.00 ते 5.30
4. श्रीं चे मुख्य गाभाऱयातील अभिषेक  : पहाटे 5.30 ते 7.00
5. श्रीं ची सकाळची सामुदायिक आरती  : सकाळी 7.30 वाजता
6. श्रीं चा सकाळचा नैवेदय     : सकाळी 7.45 वाजता
7. श्रीं चे सामुदायिक अभिषेक   :  सकाळी 8.00 ते 10.00 वा.
8. श्रीं ची महापुजा     :  दुपारी 11.30 ते 12.15 वाजता
9. श्रीं चा महानैवेदय व आरती   : दुपारी 12.15 ते 12.30 वाजता
10. श्रीं चे मंदिरातील नगारा वादन व धुप दाखविणे : सुर्यास्ता समयी
11. श्रीं ची सायंकाळची सामुदायिक आरती : सायं. 7.30 वाजता
 (संकष्टी चतुर्थीला सायं.7.15 वा.)
12. श्रीं चा सायंकाळचा नैवेदय   : सायं. 7.45 वाजता
13. श्रीं ची शेजारती    :  रात्री 10.00 वा.
14. श्रीं चे मंदिर बंद होण्याची वेळ  : रात्री 10.00 वा.


श्रीं चे मंदिरातील वार्षिक कार्यक्रम
देवस्थानतर्फे वर्षभरामध्ये विविध उत्सव व पारंपारिक सण साजरे केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने खालील उत्सव समाविष्ट होतात.

भाद्रपद यात्रा :
भाद्रपद यात्रा हा वर्ष भरातील सर्वात मोठा उत्सव असून त्यावेळी चार दिवस प्रतिपदा ते चतुर्थी पर्यंत मुक्तव्दार दर्शन म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीला हात लावुन दर्शन घेता येते व देवाला पाणी घालता येते. या चार दिवसात महागणपतीच्या चार गावात असणाऱया बहिणींना पालखीमधून आणण्यासाठी जातात. व त्याचा मान गावातील प्रत्येक आळीला देण्यात येतो. पहिल्या दिवशी पुर्वव्दार करडे येथील मांजरार्इ (दोनलार्इ) देवी दुसऱया दिवशी दक्षिणव्दार निमगाव म्हाळुंगी येथील आसरार्इ (शिरसार्इ) देवी तिसऱया दिवशी पश्चिमव्दार गणेगाव येथील ओझरार्इ, चौथ्या दिवशी उत्तरव्दार सांगवी येथील मुक्तार्इ.

माघ जन्मोत्सव –
माघ शु. प्रतिपदा ते माघ शु.पंचमी असा हा (स्वर्ग) गणेशजन्म साजरा केला जातो. धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.
जेष्ठी जन्मोत्सव व पुष्टीपती विनायक जयंती :
शेष अवतारातील पाताळ नगरीत जन्माचा हा गणेश उत्सव जेष्ठ शु.तॄतीया ते पंचमी साजरा केला जातो. व पुष्टीपती विनायक जयंतीस सत्यविनायक असे म्हणतात.

गणेश ग्रंथ पारायण :
महाराष्ट्रात प्रथमच श्री गणेश ग्रंथ पारायण मंदिरात केले जाते. सात दिवसांचा हा कार्यक्रम ग्रंथ पारायण निरूपण व किर्तने यांनी परिपुर्ण असतो.
इतर धार्मिक कार्यक्रम :
दर विनायकी चतुर्थीस गणेश याग व सहस्त्रावर्तने, नवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, काकडा आरती, सामुदायिक सत्यविनायक, गणेशयाग संपन्न होतात.

भाविकांसाठी सोयी सुविधा
1. अभिषेक व्यवस्था – दैनंदिन, वार्षिक, मासिक
2. यज्ञ व याग करण्यासाठी – यज्ञमंडप
3. मोफत अन्नदान – दररोज दुपारी 12.15 ते 2.30 व सायंकाळी 7.30 ते 9.00
4. दर्शन मंडप व सुसज्ज रेलिंग व्यवस्था
5. भव्य पार्किंग व्यवस्था
6. भाविकांना राहण्यासाठी अत्यल्प दराने भक्तनिवास
7. वैदयकिय सेवा – दैनंदिन ओ.पी.डी. व ऍम्ब्युलन्स
8. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
9. नयनरम्य स्वानंद उदयान
10. 24 X 7 सर्व परिसरामध्ये सी.सी.टीव्हीव्दारे नियंत्रण
11. स्वच्छतागॄहे

देवस्थान पुर्ण प्रकल्प
1. नगारखाना इमारत :
मंदिराचे मुळ बांधकाम पेशवार्इ काळातील असल्यामुळे त्याच मराठाशैलीचे बांधकाम व रचना कायम ठेवुन सुंदर व आकर्षक नगारखाना इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ध्यान धारणेकरिता हॉल आहे. व पहिल्या मजल्यावर गणेश मुर्ती संग्रहालय तयार करण्याचे काम चालू आहे. येथून दररोज पहाटे व संध्याकाळी आजही नगारा वाजविण्यात येतो.
2. दिवाणखाना इमारत :
सांस्कॄतिक कार्यक्रम व निवासासाठी ही इमारत बांधण्यात आलेली आहे. ही इमारत अतिशय देखणी व सोहम असून मराठा वास्तुशास्त्राची वैशिष्टये यामध्ये सामावलेली आहेत. या इमारतीमधील सांस्कॄतिक सभागॄह पेशवेकाळाची आठवण करून देते.
3. लाकडी सभामंडप :
इंदुर येथील पेशव्यांचे सरदार किबे यांनी 400 वर्षापुर्वी दगडी मंदिरासमोर लाकडी सभामंडप बांधला होता, त्याच पुनरजीवन विश्वस्त मंडळाने केले व त्याच जागेवर त्याच शैलीमध्ये नवीन आकर्षक लाकडी मंडप बांधला. यामुळे मंदिराचे रचनेत कोणताही बदल न होता मंदिराचे आकर्षक पणा व भाविकांना अपेक्षित असलेले वातावरण निर्मिती येथे झालेली दिसते. आज हा लाकडी मंडप भाविकांचे मन मोहुन टाकतो.
4. प्रासाद भवन इमारत :
भाविकांना दररोज सकाळ व संध्याकाळ भोजन प्रसादाकरिता 200 लोकांचा अद्ययावत असे सभागॄह व स्वयंपाकगॄह या इमारतीमध्ये आहे. दररोज सर्वसाधारण 1500 भाविक मोफत अन्नप्रसादाचा लाभ घेतात.
5. स्वानंद उदयान :
श्री गणेशाचे स्वर्ग लोकीचे स्वानंद, भुतलावर महागणपती मंदिराचे सानिध्यात उदयान रूपाने बहरले आहे. अनेक भाविक या नयनरम्य उदयानाचा व त्यातील आकर्षक कारंज्याचा आनंद लुटतात. शिरूर तालुक्यातील हे पहिले सार्वजनिक उदयान आहे. त्यामध्ये हुबेहुब प्राण्यांच्या नयनरम्य प्रतिकॄती ठेवण्यात आलेल्या आहेत.
6. यज्ञमंडप :
धार्मिक कार्यक्रमातील गणेश याग, यज्ञ इ.साठी यज्ञमंडपाची रचना वास्तुप्रमाणे अग्नेय दिशेला केलेली आहे. त्याचा उपयोग अनेक भाविक देवस्थान माध्यमातून घेतात.
7. पर्किंग व्यवस्था :
भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था महामार्गालगत असुन सध्याचे पार्किंग अपुरे पडत आहे. विश्वस्त मंडळाने भविष्य काळाचा विचार करून नवीन अद्ययावत पार्किंग करण्याचे नियोजन चालु आहे.
8. सुवर्णपट व चांदी आरतीपट :
अशियातील पहिले वैदीक वाडमय सुवर्ण अक्षरात गणपती अथर्वशीर्ष सुवर्णपटाचे रूपाने लिहीण्यात आलेले आहे. 4 फुट बाय 3 फुट लांबी रूंदीचे 4 किलो सोन्याचा वापर करून हा सुवर्णपट व 9 किलो चांदी वापरून श्री समर्थ रामदास रचित आरतीचा पट लाकडी मंडपात बसविण्यात आला आहे. हा सुवर्णपट व चांदीपट भाविकांना सुवर्णयुगात नेतो.
9. महागणपती दागिणे :
विश्वस्त मंडळाने महागणपतीसाठी सोन्याचा हार, सोन्याचे गंध सोन्याचा मुकूट, सोन्याचे सोंड अलंकार केलेला आहे. महागणपतीसाठी हे दागिने रोज वापरले जातात.
10. महागणपती व्दार यात्रा मंदिरे :
महागणपतीचे चार बहिणींची मंदिरे कर्डे, निमगाव, गणेगाव व ढोक सांगवी येथे आहेत. त्या मंदिराची नवीन सुबक बांधणी करून आकर्षक मंडप बांधण्यात आले आहेत.
11. भव्य महाव्दार : 
संपुर्णपणे दगडी बांधकाम रचना पुढील बाजुनी असून, पेशवार्इ काळातील आठवण करून देणारे स्थापत्य व नगारा व स्वागत कमान असणारी इमारत अत्यंत भव्य व आकर्षक आहे.
12. रिंगरोड :
भाविकांना मंदिरात जाण्यासाठी विशेष पादचारी मार्ग, वाहनासाठी रस्ता व बाजुने दिवे असा भव्य 60 फुटी रस्ता आहे. हा रिंग रोड महाव्दारापासून मंदिराचे मागील बाजुन नगर रस्त्यास मिळालेला आहे.
13. दर्शनमंडप :
देवस्थानमध्ये महागणपतीचे दर्शनाकरिता येणाऱया भाविकांची संख्या लाखो मध्ये आहे. या भाविकांसाठी दर्शनाची उत्तम सोय होण्याकरिता व भाविकांना दर्शनाकरिता होणारा त्रास टाळुन एका अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञ वापरून दर्शन मंडप बांधण्यात आलेला आहे. अष्टकोन आकाराच्या या दर्शन मंडपाचे वैशिष्टये  म्हणजे भाविकांना सर्व बाजूने खुले आकाश दिसेल व मंदिर परिसर पाहता येर्इल. आतील बाजुस स्टील रेलिंग असुन त्यामधील प्रत्येक विभागात वॄध्दांसाठी बसण्याची सोय, स्वच्छतागॄह, गणेश दर्शनाकरिता सी.सी.टीव्ही इ. सोयी केल्या आहेत. प्रत्येक भाविक याठिकाणी सुरक्षा दारातून आत येर्इल अपंग व वॄध्द लोकांकरिता थेट प्रवेशाची योजना आखलेली आहे.
14. व्यापारी संकुल :
60 फुटी रिंगरोड करण्यासाठी ज्या दुकानदारांची दुकाने हलविण्यासाठी सहकार्य केले त्यांच्यासाठी 60 दुकाने अशी व्यापारी दुकानांची इमारत बांधण्यात आली आहे. या व्यापारी संकुलातील दुकाने भाडे तत्वावर देण्यात आलेली आहेत.
 
देवस्थान नियोजित प्रकल्प
1. अद्ययावत भक्तनिवास इमारत :
सध्याच्या भक्तनिवस खोल्या अपुऱया असल्यामुळे मंदिरालगतच असणाऱया देवस्थानच्या 66 आर जमीनीवर 125 खोल्यांचे भक्तनिवास होणार आहे. यामध्ये रिद्धी व सिद्धी अशा दोन इमारती असुन येणाऱया सर्व प्रकारच्या भाविकांसाठी दर्जेदार प्रकारच्या खोल्या आहेत. त्यामध्ये सुट, डिलक्स, सुपरडिलक्स, अशाप्रकारच्याही खोल्या आहेत. अत्यंत आधुनिक सोयी असणारे हे भक्तनिवास बांधण्याचा खर्च रू. 20 कोटी  अपेक्षित आहे.
2. भव्य सांस्कॄतिक भवन :
मंदिर परिसराची नगररोडला लागूनच असलेल्या जागेत भव्य सांस्कॄतिक भवन करावयाचे असुन त्याखाली पार्किंग करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अंदाजे 10 कोटी खर्च अपेक्षित आहे.
3. मंदिरघाट व नौकानयन :
मंदिराचे मागील बाजुस असणारा पाण्याच्या प्रवाहाचा उपयोग करून दुतर्फा दगडी घाट बांधण्यात येणार असून आडविलेल्या पाण्यामधून निर्माण होणाऱया जलाशयामध्ये नौकानयनाची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मंदिराची शोभा वाढणार असुन पर्यटन केंद्र विकासासाठी मदत होणार आहे. या प्रकल्पाकरिता रू.2 कोटी खर्च अपेक्षित आहे.
4. अद्ययावत रूग्णालय :
भाविष्यकाळाचा विचार करून पुणे औरंगाबाद महामार्गावरील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी अद्ययावत रूग्णालयाची नितांत गरज आहे. त्यामुळे देवस्थानतर्फे 100 कॉटसचे रूग्णालय, ऑपरेशन थेटर व रिसर्च सेंटर बांधण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रूग्णांस अल्पदरात वैदयकीय सेवा उपलब्ध होर्इल. तर महामार्गावरील अपघातग्रस्तास तातडीची सेवा मिळु शकेल. या रूग्णालय व संशोधन केंद इमारतीचा खर्च अंदाचे रू. 23 कोटी अपेक्षित आहे.
5. पालखी मार्ग व व्दार यात्रा मार्गरस्ते :
उत्सवामध्ये महागणपतीची पालखी गावांमध्ये निरनिराळया भागात जाते, त्याचप्रमाणे चार गावांना व्दारयात्रेकरिता पालखी जात असते. हे सर्व पालखी मार्ग व व्दारयात्रा मार्ग रस्ते डांबरीकरण करून भाविकांना सोय उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे खर्च रू. 1 कोटी एवढा अपेक्षित आहे.
6. शैक्षणिक संस्था इमारत :
मंदिराजवळ अद्ययावत औदयोगिक क्षेत्र विकसित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांसाठी इंजिनियरींग व सायन्स महाविदयालय सुरू करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाचा फायदा अनेक ग्रामीण विद्यार्थी घेतील असे अपेक्षित आहे. या शैक्षणिक इमारतीकरिता अंदाजे खर्च रू.9 कोटी एवढा अपेक्षित आहे.

नियोजित प्रकल्पांसाठी येणारा खर्च
1. अद्ययावत भक्तनिवास इमारत -  20 कोटी
2. भव्य सांस्कॄतिक भवन  -  10 कोटी
3. मंदिरघाट व नौकानयन -   2 कोटी
4. अद्ययावत रूग्णालय -   23 कोटी
5. पालखी मार्गव व्दार यात्रा मार्गरस्ते – 1 कोटी
6. शैक्षणिक संस्था इमारत -   9 कोटी

भारतामधील अग्रगण्य प्रकल्प
देवस्थानचे 96 एकर जमीनीमध्ये अत्यंत नाविण्यपुर्ण व भारतीय संस्कॄतीचे दर्शन घडविणारा निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा व भारतीय इतिहास व प्राचीन संस्कॄति जिवंत करणारी महत्वकांक्षी योजना तयार करण्याचे काम चालू आहे. अमेरिकेतील ऍपकॉट सेंटरचे धर्तीवर भारतातील आचार विचार व संस्कॄतीचे दर्शन घडविणारे, धार्मिक देवालये, हिंदु धर्माची शिकवण देणारे सस्कॄत विद्यापीठ महाप्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे रांजणगाव देवस्थानचे नाव जगाच्या नकाशावर कायम राहील.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे येण्यासाठीचे विविध मार्ग
1. रस्ता :
पुणे-औरंगाबाद महामार्गावर हे ठिकाण असुन पुण्यापासुन फक्त 51 कि.मी अंतर आहे.
2. विमानसेवा :
पुणे विमानतळावर उतरल्यावर रस्तामार्गाने केवळ 1 तासात देवस्थानमध्ये येता येते. आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे भारतामधुन व भारताबाहेरून विमानसेवा उपलब्ध आहे.
3. रेल्वे सेवा :
पुणे स्टेशन, केडगाव, अहमदनगर व दौंड या रेल्वे स्थानकावर उतरून रस्तामार्गाने देवस्थानमध्ये येता येते.
अंतर

 1. पुणे ते श्री क्षेत्र रांजणगाव 51 कि.मीटर
 2. औरंगाबाद ते श्री क्षेत्र रांजणगाव 195 कि.मी.
 3. मुंबई ते श्री क्षेत्र रांजणगाव 220 कि.मी.
 4. नाशिक ते श्री क्षेत्र रांजणगाव 240 कि.मी.
 5. कोल्हापूर ते श्री क्षेत्र रांजणगाव 285 कि.मी.देवस्थान संपर्कः
Website : www.mahaganaptidevasthan.org
Email : mahaganpatidevasthan@gmail.com
Facebook : mahaganpatidevasthan
Twiter : mahaganpatidevasthan
Whats app : 9209202222
Phone : 02138 – 243200/01
Mobile : 9209202222

संबंधित लेख


बाबूराव पाचर्णे विरुध्द अशोक पवार अशी तुल्यबळ लढत होणार आहे. दोघांमध्ये जड पारडे कोणाचे?
 बाबूराव पाचर्णे
 अशोक पवार
 अन्य