गाव - सादलगाव

सरपंच उपसरपंच
सरपंच - सौ. वैशाली नामदेव होरकळ
उपसरपंच - श्री. संतोष मारुती जगताप
गावची लोकसंख्या - ३२३४
दूरध्वनी क्रमांक - ९९६०९९२१८५
तलाठी - हनुमंत तुकाराम शिवले
ग्रामसेवक - किशोर भिमराव बनकर

ग्रामदैवत श्री बापुजीबुआंच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि भीमा नदीचा सहवास लाभलेले आमचे गाव म्हणजे सादलगाव. शिरूर तालुक्याची हद्द येथे संपते आणि दौंड तालुका सुरू होतो. गाव तसे पहिले तर खूपच छोटे पण आमच्या गावची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे ती यात्रेत होणाऱ्या आपापल्या ऐपती नुसार देवासाठी यात्रेत फक्त पेढेच असतात. यंदा यात्रेत १०० क्विंटल पेढ्यांची उलाढाल झाली. त्यामुळे अनेक फायदे होतात.
 • ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होतो.
 • व्यापारयांना बाजारपेठ उपलब्ध होते .
 • ग्रामस्थांना पेढे गावातच उपलब्ध होतात.

गावात खालील प्रमाणे कामे झालेली आहेत -
 • ग्रामदैवत बापुजीबुवांच्या नदीतील मंदिराचे काम गाववर्गणीतून पूर्ण झालेले आहे.
 • राम मंदिराच्या भव्य सभा मंडपाचे काम चालू आहे.
 • शेजारच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे झालेली आहेत (उदा. गणपतीमाळ ते सादलगाव, मांडवगण फराटा ते सादलगाव,)
 • शिवसाम्राज्य प्रतिष्ठान तर्फे लोकसहभागातून गावातील श्रीदत्त मंदिराचे सुशोभीकरण (सीमाभिंत आणि वनीकरण) करण्यात आले आहे.
 • जि. प. शाळेच्या नवीन खोल्या बांधून झालेल्या आहेत.
 • गावाला ८ वी व ९ वी माध्यमिक वर्गांसाठी मंजुरी मिळाली आहे.
 • गाव ८० टक्के हागणदारी मुक्त झालेले आहे.
 • ग्रामपंचायत आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गावची स्वतःची नर्सरी लवकरच चालू करण्यात येणार आहे. ज्यामधून प्रत्येक घरात झाडांचे मोफत वाटप सुरु होणार आहे.
 • बंधाऱ्यात साठणाऱ्या नदीच्या पाण्यातील जलपर्णी मुळे गावात दुर्गंधी पसरते. त्यामुळे ग्रामपंचायत उन्हाळा सुरु होण्या अगोदर नदीची साफसफाई करते. तसे पहिले तर नदीमुळे सादलगाव हे बागायतदार गाव म्हणून ओळखले जाते. इथे जास्त करून उसाचे पिक घेतले जाते.

गाव जरी लहान असले तरी गावचे शिवार खूप मोठे आहे. त्यामुळे गाव उस उत्पादनात अव्वल स्थानी आहे. इथला सगळा उस घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला जातो. उसाशिवाय बरीच पिके घेतली जातात जसे बाजरी, गहू, गुरांचे खाद्य, तरकारी, कलिंगड, भुईमुग इत्यादी.

आपल्या गावच्या पानामध्ये सरपंच, उपसरपंच यांचे छायाचित्र व गावची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी संपर्क साधा.
अधिक माहितीसाठी संपर्क-

तेजस फडके- 9766117755 / 9049685787
सतीश केदारी- 8805045495 / 9403734322

 • 1

दुकानदाराने चिमुकलीला चॉकलेट नाकारणे योग्य आहे का? दुकानदारावर कारवाई व्हावी काय?
 होय
 नाही
 माहित नाही