रांजणगावच्या रिक्षाचालकाचा कुंडात पाय घसरला अन्...

रिक्षा चालक निघोज कुंड येथील कुकडी नदीच्या प्रवाहात पाय धुण्यासाठी गेले. नदीत शेवळ असल्याने पाय घसरून ते नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडले. पाण्याच्या प्रवाहास वेग असल्याने पाण्यात वाहून गेले.

शिरूर: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील रिक्षाचालकाचा निघोज कुंड येथे पाय घसरला आणि ते कुकडी नदीच्या प्रवाहामध्ये वाहात गेले. इसाक रहेमान तांबोळी (वय 35) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. पारनेर पोलिसांनी मंगळवार (ता. 20 ) रात्रीपासूनच शोध घेत आहेत.

ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आठवडाभरात अंतिम होणार

या बाबत माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी पाच वाजणेच्या सुमारास उशा सुरेश जगदाळे (रा. रांजणगाव गणपती ता. शिरूर ) या जवळा येथील आपल्या मुलीकडे नवरात्रनिमित्ताने काही महिलांना सोबत फराळ घेऊन गेल्या होत्या. त्यांनी इसाक रहेमान तांबोळी यांची रिक्षा केली होती. या महिला तांबोळी यांच्या रिक्षामधून गेल्या होत्या. मुलीकडे त्या फराळ देऊन परतत असताना या महिला निघोज कुंड येथे देवीच्या दर्शनासाठी काही वेळ थांबल्या होत्या. त्यावेळी रिक्षा चालक निघोज कुंड येथील कुकडी नदीच्या प्रवाहात पाय धुण्यासाठी गेले. नदीत शेवळ असल्याने पाय घसरून ते नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडले. पाण्याच्या प्रवाहास वेग असल्याने पाण्यात वाहून गेले. या वेळी ते वाहून जाताना तेथे उपस्थीत काही लोकांनी त्यांना पाहिले व आरडाओरडा केली. मात्र, तोपर्यंत ते प्रवाहात थेट काळी खोल कुंडात वाहून गेले. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पारनेर पोलिस स्टेशनला माहिती दिल्या नंतर सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या परिसरामध्ये तांबोळी याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

Video: पेट्रोल पंपावरील अपघाताचा थरार...

दरम्यान, खाली खोल रांजण खळगे (कुंड) असल्याने त्या खळग्यात ते अडकण्याची शक्यता आहे. तसेच पाण्याच्या प्रवाह मोठा व जोरात वाहत असल्याने ते दूर वाहून जाण्याची शक्यातही नाकारता येत नाही.

मी या वयात इतका फिरतोय, तू किमान बाहेर पड..!

Title: ranjangaon rickshaw driver missing kukdi river nighoj kund
प्रतिक्रिया (1)
 
Ramdasdurge
Posted on 22 October, 2020

Very bad

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे