'बाहुबली' चित्रपटाला टक्‍कर देणार सैफ अली खान

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता सैफ अली खानला २०२० हे वर्ष फलदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर धम्माल केली होती. तसेच 'जवानी जानेमन' या चित्रपटानेही चांगला गल्ला जमविला होता आणि आता तो लवकरच पुन्हा एकदा वडील होणार आहे. याशिवाय त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

मुंबई: बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता सैफ अली खानला २०२० हे वर्ष फलदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर धम्माल केली होती. तसेच 'जवानी जानेमन' या चित्रपटानेही चांगला गल्ला जमविला होता आणि आता तो लवकरच पुन्हा एकदा वडील होणार आहे. याशिवाय त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

सैफ अली खान साकारणार या चित्रपटात रावणाची भूमिका...

सैफ अली खान हा लवकरच मोठ्या पडद्यावर 'बाहुबली' फेम प्रभास याला टक्‍कर देणार आहे. हे दोघेजण 'आदिपुरुष' मध्ये एकत्रित झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास हा मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे सैफ अली खान हा एका खुंखार खलनायकच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत हे करत आहेत. या चित्रपटाचे नवीन पोस्टर करिना खान-कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

 

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सैफ अली खान हा 'भूत पोलीस' या हॉरर-कॉमेडी चित्रपटातही काम करणार आहे. यात त्याच्यासोबत अर्जुन कपूर आणि फातिमा सना शेख महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. अर्जुन कपूर आणि करिना कपूर यांनी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'की ऍण्ड का' या चित्रपटात एकत्रित काम केलेले आहे.

Title: Saif Ali Khan to star in Baahubali
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे