गणेशोत्सवात रक्तदानाचा उपक्रम कौतुकास्पद: कुसुम मांढरे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): गेली 2 वर्षे कोरोनाच्या सावटानंतर साजरा होत असलेल्या गणेशोस्तवात काळात आनंद नगर प्रतिष्ठाणने सामाजीक बांधीलकी जपत कै. बाळासाहेब भांडवलकर यांच्या स्मरनार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करित समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला असून गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील आनंद नगर प्रतिष्ठाण व केईएम ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने कै. बाळासाहेब भांडवलकर यांच्या स्मरनार्थ आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुम मांढरे व पंचायत समितीच्या सभापती मोनीका हरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे महानगर नियोजन समिती सदस्य प्रकाश गव्हाणे, कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच राहुल गव्हाणे, विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, माजी उपसरपंच कांतीलाल फडतरे, प्रकाश ढेरंगे, नितीन गव्हाणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील भांडवलकर, अ‍ॅड. सचिन गव्हाणे, पै. प्रविण गव्हाणे, भरत गव्हाणे, महेश गव्हाणे आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला कोरेगाव भीमाचे सुपुत्र महेश गव्हाणे यांनी प्रथमत: रक्तदान करत सुरुवात केली.

सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रणव गव्हाणे, रोहित गायकवाड, सागर कापसे, निलेश गायकवाड, विनायक शिवले, महेश सरडे, आकाश जाधव, गणेश गायकवाड, सुनील लोखंडे, श्रीशैल कोरे, उज्ज्वल ढावरे, ऋषीकेष तांबे, सौरभ गव्हाणे, नितीन चौरे यांसह आनंद नगर प्रतिष्ठानच्या तरुणांनी विशेष पुढाकार घेतला.

यावेळी बोलताना रक्तदानाची समाजास गरज असलेल्या व गावातील धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कै. बाळासाहेब भांडवलकर यांच्या स्मरनार्थ रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबीराचे आनंद नगर प्रतिष्ठानने आयोजन करित समाजात आदर्श निर्माण केला असुन या उपक्रमाचे अनुकरण करुन इतर मंडळांनीही शिबीर राबवायला हवे, असे शिरुर पंचायत समितीच्या सभापती मोनीका हरगुडे यांनी सांगितले.