भुमी आभिलेख कार्यालयातील मोजणीची शेकडो प्रकरणे गायब

मुख्य बातम्या शिरूर तालुका

चूकार कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदया अंतर्गत कारवाई करा; ऍड. सागर दरेकर

शिरुर (अरुणकुमार मोटे): भुमि अभिलेख शिरूर कार्यालयाकडून गेल्या सात महीन्यापासून मोजणी होऊनही शेतकऱ्यांना क प्रत नकाशा उपलब्ध करून देण्यास अदयापही टाळाटाळ केली जात आहे.

वरीष्ठ कार्यालयाकडे याबाबतची तक्रार करुन देखील दोषींवर अद्याप कारवाई होत नसल्याचे तक्रारदार ऍड. सागर दरेकर यांनी सांगितले आहे. अशा प्रकारचे अनेक शेतकरी या कार्यालयाकडे मोजणी प्रकरणासाठी, क प्रत मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून हेलपाटे मारत आहे. त्यामुळे येथील कामचुकार कर्मचाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदया अंतर्गत कारवाई करा याबाबतची लेखी तक्रार ऍड. सागर दरेकर यांनी उपसंचालक, भुमी अभिलेख कार्यालय पुणे प्रदेश, पुणे यांच्याकडे केली आहे. या कार्यालयातील मोजणी केलेली शेकडो प्रकरणे चक्क गायब असून शेतकऱ्यांना क प्रत मिळाली नाही. यामागचे गौडबंगाल काय आहे. हे शोधणे महत्वाचे आहे. आपल्याच नशेत गुंग असलेल्या ढीम्म प्रशासनाला याचा काही फरक पडत नसून शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून शेतकऱ्यांना मोठा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

नुकतीच शिरूर कार्यालयाच्या उपअधिक्षक पदाची सुत्रे अमोल भोसले यांनी नव्याने हाती घेतली असून अतिशय चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. प्रलंबित कामांची माहिती घेऊन नागरीकांना योग्य न्याय देण्यासाठी ते कार्यालयात जास्त वेळ उपस्थित राहत असून नागरीक आपआपल्या कामासाठी मोठी गर्दी करत आहे.

तत्कालिन छानणी लिपिक यांच्यावर होणार का कारवाई?…

भुमी अभिलेख कार्यालयातील शेकडो प्रकरणे गायब होण्यापाठीमागे छानणी लिपिकच जबाबदार असून त्यांची लेखी तक्रार वरिष्ठांकडे केल्याने त्यांच्यावर वरिष्ठ कधी कारवाई करणार याकडे शिरूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.