आदर्शवत जीवन हीच काळाची गरज; चंद्रकांत पाटील

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जीवनामध्ये आदर्शवत जीवन हि काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट करुन जिद्दीच्या जोरावर यश मिळवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने सभासद पाल्य गुणगौरव सोहळा प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील बोलत होते, याप्रसंगी राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण अध्यक्ष निलेश काशीद, उपाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तबाजी वाघदरे, कृती समितीचे सतीश निमसे, जुन्नर तालुका शिक्षक परिषदेचे अध्यक्ष कैलास कर्वे, संतोष ढोबळे, प्रा. रामदास तनपुरे, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, खजिनदार सतेश शिंदे, संचालक जगन्नाथ जाधव, प्रमोद देशमुख, शकील अन्सारी, गोविंदराव सूळ, वैशाली बेलोस, जयश्री गव्हाणे, शाखा व्यवस्थापक विजय गायकवाड, लेखापाल दिनेश फापाळे, सुषमा पानसरे, अक्षय डोंगरे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 10 मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

दरम्यान बोलताना संस्थेच्या सभासदांनी जास्तीत जास्त ठेवी जमा करुन पतसंस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर यावेळी शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सभासदांनी कॅशलेस मेडिक्लेम योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले असून विष्णू दौंडकर व रामदास काळे या सभासदांचा सर्वात जास्त मुदत ठेवी ठेवल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्ष दुबे यांनी केले तर भाऊसाहेब आहेर यांनी आभार मानले.