शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.

शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर परवाना रद्द करावा. सर्व्हे नं १९४९ यामध्ये पार्किंगच्या जागेत अनधिकृत बांधकाम करुन मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु केला आहे. शिरुर शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणारी बाजार पेठेमध्ये बेकायदेशीर सर्व्हे नं. ३२१ मध्ये बांधकाम केले आहे.

अशा अनेक मुद्यांवर शिरुर नगरपरिषदेच्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमरण उपोषण चालू केले आहे. यावेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे, फरीद सय्यद, साजदी शेख, हुसेन शाह, आदी उपस्थित होते.