पुण्यात घडलेल्या घटनेच्या शिषेधार्थ शिरुर शहरात मनसेच्या वत्तीने आंदोलन…

शिरूर तालुका

सविंदणे (अरुणकुमार मोटे): पुणे दहशदवादी हालचालींचे ठिकाण होत आहे का? तसेच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर राहतात हे मनसे सातत्याने सांगत आहे अशीच घटना काल पुणे येथे घडली असुन काही समाजकंटकांकडुन “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आज (दि. २५) रोजी शिरुर शहर मनसेच्या वतीने आस्वाद हाॅटेलजवळ निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी मनसे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसे महीला आघाडीच्या डाॅ. वैशाली साखरे, महीला शहराध्यक्ष शारदा भुजबळ, प्रसन्ना भोसले, विलास वीर, शैलेश जाधव, तसेच भाजपाचे उमेश शेळके, अजिंक्य तारु, रविराज बैनाडे, राकेश परदेशी, अमर झेंडे, नितीन काळे, राहुल भोते, योगेश कदम, रोहन जासुद तसेच सर्वच जाती धर्माचे लोक उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अविनाश घोगरे म्हणाले की, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर देशातून हाकलून दया. यासाठी मनसे सातत्याने आंदोलने करीत आहे तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी हे आश्रयाला असतात हे सांगत असुन कारवाई होत नाही, अशा देशद्रोही समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.

जेथे देशभक्ती आणि देशप्रेमाचा विषय उपस्थित राहतो, अशा वेळी आपल्या देशातील सर्व जाती,धर्म,पंथ यांनी एकत्र येऊन आपल्या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या संघटना मोडीत काढल्या पाहीजे, अशी भावना मनसेच्या महीला आघाडीच्या शारदा भुजबळ आणि डाॅ. वैशाली साखरे यांनी व्यक्त केली.