शिरुर येथील रामलिंग महीला उन्नतीच्या वतीने माहेर येथे रक्षाबंधन साजरे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) आपण जीवनात प्रत्येक स्त्रीला बहिणी प्रमाणे सन्मान दिला पाहिजे. वाईट प्रवृत्तीपासुन त्यांचे रक्षण केले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही मुलीला समाजात वावरताना भीती वाटनार नाही. मुली या सुरक्षित राहतील. जेव्हा तुम्ही इतर मुलींना स्वतःच्या बहिणीप्रमाणे वागणूक देताल. तेव्हाचं खरे या सणाचे महत्त्व साध्य होईल असे प्रतिपादन रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

 

बहीण-भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाला बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर त्यानं आपल रक्षण करावं अस वचन बहीण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पोर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. मंगळवार (दि 29) रोजी शिरुर येथील माहेर संस्थेत अनाथ मुल शिक्षण घेत आहे. त्यातील अनेक मुलांना बहीण नाही. त्यामुळे त्या मुलांना रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीची कमतरता जाणवू नये. म्हणून आज या मुलांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राखी बांधत खाऊ वाटप करण्यात आला.

 

यावेळी बोलताना कर्डीले पुढे म्हणाल्या, तुम्हाला सख्या बहिणी जरी नसतील तरी आम्ही सख्या बहिणीप्रमाणेचं तुमच्या सोबत आहोत .कधीही कोणतीही अडचण आली तरी बिनधास्त आम्हाला सांगत जा. यावेळी माहेर संस्थेतील मुलांनी नृत्य सादर केले. यावेळी उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

 

यावेळी माहेर संस्थेतील काही मुलांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, तुम्ही येऊन आमच्या सोबत रक्षाबंधन साजरी केली. त्यामुळे आमच्या बहिणीची उणीव तुम्ही भरुन काढली. त्यामुळे आम्हालाही खूप छान वाटले. तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला. त्यामुळे एक कुटुंब असल्याची भावना आमच्यात जागी झाली. आमच्यावर बहिणीप्रमाणे प्रेम करणारे पण कुणीतरी आहेत. हे आज आम्हाला कळलं. त्यामुळे तुम्ही असेच दरवर्षी आमच्याकडे येत जा. आज आम्हाला खूप छान वाटले. यावेळी सुवर्णा सोनवणे, डॉ वैशाली साखरे, वैशाली गायकवाड, आरती मोरे, शबाना शेख, धनश्री मुंढे, निर्मला ढोकले आदीमहिला उपस्थित होत्या.