कारेगावच्या उपसरपंचपदी शहाजी तळेकर यांची बिनविरोध निवड

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शहाजी पोपट तळेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच संदीप नवले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदी ही निवड करण्यात आली. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली.

यावेळी शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहोकडे, सरपंच निर्मला नवले, कारेगावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल ओस्तवाल, बाभुळसरचे माजी सरपंच दशरथ फंड, माजी सरपंच पुष्पलता ओस्तवाल, अँड हिरामण गावडे, माजी उपसरपंच नवनाथ नवले, राजेंद्र नवले, अजित कोहोकडे , संदीप नवले, पृथ्वीराज नवले, ग्रामपंचायत सदस्य हौसाबाई जगताप, तुषार नवले, नागेश शेलार, प्रियांका गवारे , ग्रामसेवक किसन बिबे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेकर यांचा सामाजिक कार्यकर्ता ते उपसरपंच पर्यंत प्रवास…

शहाजी तळेकर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असुन गेल्या काही वर्षात त्यांनी सामाजिक कार्यकर्ता ते उपसरपंच असा राजकीय प्रवास केला आहे. कारेगाव येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे 10 वर्ष अध्यक्ष, कारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत 4 वर्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कारेगाव येथील यात्रा कमिटीचे 4 वर्ष अध्यक्ष, महाशिवरात्री निमित्त भरवण्यात येणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहाचे 1 वर्ष आयोजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरुर-आंबेगाव कार्याध्यक्ष असा त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास झाला असुन दोन वर्षांपुर्वी कारेगाव ग्रामपंचायतचे सदस्य म्हणुन ते निवडुन आले होते. दोन वर्षांनंतर त्यांची नुकतीच उपसरपंच म्हणुन बिनविरोध निवड करण्यात आली आहे.