शिरुर तालुक्यात विवाह केल्याने युवकाला मारहाण; गुन्हे दाखल

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील युवकाने विवाह केल्याने युवकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे दादासो ज्ञानोबा पुंडे, विजय ज्ञानोबा पुंडे, अतुल बाजीराव पुंडे, निरंजन दादा पुंडे व अजित टाकळकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील राम दळवी या युवकाने युवतीच्या संमतीने डिसेंबर २०२१ मध्ये विवाह केला होता. मात्र, राम याच्या घराचे काम सुरु असल्याने त्याची पत्नी वडिलांच्या घरी राहत होती. विजय पुंडे या युवकाने राम याला ९ ऑक्टोबर रोजी फोन करुन ‘तुझ्या लग्नाचे बोलायचे आहे’, असे म्हणून घरी बोलावून घेतले.

पुंडे यांच्या घरासमोर काही व्यक्ती होते. त्यांनी राम याला लग्नाबाबत विचारले. राम याने मी लग्न केले आहे, असे म्हटले असता तेथे उपस्थित सर्वांनी राम याला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत केली.

याबाबत राम भाऊसाहेब दळवी (वय २५, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दादासो ज्ञानोबा पुंडे, विजय ज्ञानोबा पुंडे, अतुल बाजीराव पुंडे, निरंजन दादा पुंडे (सर्व रा. कान्हूर मेसाई, ता. शिरुर, जि. पुणे), अजित टाकळकर (रा. टाकळकरवाडी ता. खेड जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहेत.