शिक्रापुरच्या ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके

शिरूर तालुका

निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने पुस्तके उपलब्ध

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या भैरवनाथ मोफत वाचनालय मध्ये 17 हजार हून अधिक वेगवेगळी पुस्तके उपलब्ध असताना आता निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाचनालयाला सापांबाबतची पुस्तके भेट देण्यात आल्याने ग्रंथालयात आता सापांबाबतची पुस्तके उपलब्ध झाली आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या भैरवनाथ मोफत वाचनालयमध्ये वेगवेगळी पुस्तके वाचनासाठी नागरिक येत असताना अनेकदा काही नागरिक सापांबाबतच्या पुस्तकांची मागणी करत असल्याने ग्रंथपाल संतोष काळे यांनी निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेशी याबाबत चर्चा केली असता नुकतेच सदर संस्थेच्या वतीने ग्रंथालयाला सर्पतज्ञ निलीमकुमार काहीरे लिखित साप व ज्ञानेश्वर म्हात्रे लिखित सापांची अद्भुत दुनिया हि पुस्तके भेट देण्यात आली आहेत.

याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, ग्रंथपाल संतोष काळे, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख, सचिव अमर गोडांबे, संचालक दत्ता कवाद, अलताभ सय्यद, सर्पमित्र अमोल कुसाळकर, विजय पडघन, राहुल शेजवळ, आदिनाथ चव्हाण हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना सापांबाबतची माहिती नागरिकांना असणे गरजेची असून निसर्व वन्यजीव सामाजिक संस्थेच्या वतीने आता गावातील नागरिकांना सदर माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सरपंच रमेश गडदे यांनी सांगितले. दरम्यान ग्रंथपाल संतोष काळे यांनी सर्वांचे आभार मानले.