सात मिनिटातच घडला चमत्कार, डॉक्टरने नवजात बाळात फुंकले प्राण…

महाराष्ट्र

मुंबई: सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ शेअर होत असतात ते बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओवर विश्वास ठेवणं देखील कठीण होतं. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

असं म्हणतात की, देव आपल्याला दिसत नाही पण तो आपल्या आजूबाजूला असतो, फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. या व्हिडीओमध्ये मात्र तुम्हाला देव नक्कीच दिसेल. हा व्हिडीओ आहे एका डॉक्टरनं केलेल्या चमत्काराचा. या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, एका महिलेनं एका नवजात बालकाना आपल्या अगदी जवळ घेतलं आहे आणि ती काहीतरी करत आहे.

ज्यानंतर ती त्या बाळाला उलटं करते आणि त्याची पाठ घासू लागते. व्हिडीओत पुढे काही वेळानं हे बाळ हसू लागतं. मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील ही महिला एक डॉक्टर आहे. खरंतर बाळाच्या जन्मानंतर ते बाळ काहीही हालचाल करत नव्हतं, ज्यानंतर या महिला डॉक्टरने या नवजात बाळाला जवळ जवळ 7 मिनिटं सलग सीपीआर दिला, ज्याला विज्ञानात ‘माउथ टू माउथ रेस्पिरेशन म्हणतात.’ असं करुन या डॉक्टरने त्या बाळाला श्वास घेण्यासाठी मदत केली.

तसेच त्याच्या पाठीला चोळून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला, अखेर या डॉक्टरच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्या बाळाचे प्राण वाचले. बाळ शुद्धीवर आल्यानंतर हे गोंडस बाळ डॉक्टरकडे पाहून हळूच हसू लागले. जे पाहाताना खूपच भावनीक आणि मनाला स्पर्श करणारं आहे.