Shirur Police rally

शिरूर पोलिसांकडून स्वांतत्र्यदिनानिमित्त मोटारसायकलवर तिरंगा रॅली…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात शिरूर पोलिसांकडून स्वांतत्र्यदिनानिमित्त मोटारसायकलवर तिरंगा रॅली काढण्यात आली होती. रॅली दरम्यान ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, हिंदुस्थान जिंदाबाद,’ या प्रकारच्या घोषणा देवून शिरूर शहरात मोठया उत्साहात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली व रॅलीमधून एकतेचा संदेश दिला गेला.

शिरूर पोलिसांच्या वतीने शिरूर शहरात १५ ऑगस्ट रोजी सहायक पोलिस निरीक्षक सहाय्यक यादव संदीप यांचे नेतृत्वाखाली शिरूर शहरात शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार यांची मोटर सायकल रॅली शिरूर पो.स्टे.-पाबळ फाटा – मुंबई बाजार -डंबे नाला – पाच कंदील चौक – बीजे कॉर्नर – निर्माण प्लाझा – हुडको कॉलनी – रयत शाळा मैदान – निर्माण प्लाझा – बीजे कॉर्नर – तहसील कार्यालय -पोलिस स्टेशन अशा मार्गे दिमाखदार रीत्या पार पडली.

रॅली दरम्यान “भारत माता की जय, वंदे मातरम्, हिंदुस्थान जिंदाबाद,” या प्रकारच्या घोषणा देवून शिरूर शहरात मोठया उत्साहात तिरंगा ध्वज रॅली काढण्यात आली व रॅलीमधून एकतेचा संदेश दिला गेला.