करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी अवतरले नागराज

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करडे गावात आज शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त भैरवनाथ मंदिरा समोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ आज सायंकाळी सहाच्या सुमारास नागराजांनी दर्शन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी लांबूनच मोठ्या मनोभावे नागराजांचे दर्शन घेतले.

करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि नंदी आहे. आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने काही ग्रामस्थ मंदिराच्या परीसरात बसले असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक त्याठिकाणी एक नाग पिंडीजवळ आला त्यातील उपस्थित काही लोकांनी त्या नागाचे फोटो आणि व्हिडीओ काढत सोशल मीडियावर टाकले. सध्या शिरुर तालुक्यात सगळीकडे सोशल मीडियावर या नागराजांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.