गुन्हे शोध पथकाचा चार्ज हाती घेताच PSI एकनाथ पाटील यांची धडाकेबाज कारवाई

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर शहर परिसरात गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणा-या आरोपीस पिस्टल व जिवंत काडतुसासह केले जेरबंद

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांना रविवार (दि 25) रोजी दुपारी चारच्या सुमारास गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली कि स्वप्नील शंकर कुरदंळे हा विश्व विजय हाईटस बाबुरावनगर येथील त्याच्या ऑफिसमध्ये बेकायदेशिर विनापरवाना गावठी पिस्टल जवळ बाळगुन बसलेला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करुन आरोपीस पिस्टलासह ताब्यात घेण्याबाबत पोलीस पथकास सुचना दिल्या. पोलिसांनी तातडीने हालचाल करत त्याला अटक केले असता त्याच्याकडे 30 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल आणि 1 हजार किंमतीचे पाच जिवत काडतुस असा एकुण 31 हजार किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे.

कोरेगाव भिमा येथे 1 जानेवारी रोजी असणाऱ्या शौर्य दिनाच्या पार्श्वभुमीवर तसेच प्रतिबंधक कारवाईच्या अनुशंगाने पुणे जिल्हयामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणुन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात बेकायदा बिगर परवाना शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर भारतीय हत्यार कायदयांतर्गत कारवाई करणेबाबत आदेश केले होते.

त्याच अनुषंगाने शिरुर पोलिसांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकातील पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील पोलिस हवालदार सुद्रिक, पोलिस नाईक जगताप, पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ हाळनोर, थोरात यांनी बातमी मिळाल्यानंतर तातडीने बाबुरावनगर येथे जात स्वप्नील शंकर कुरदंळे (वय ३१) रा. विश्व विजय हाईटस बाबुरावनगर, शिरुर ता. शिरूर जि.पुणे हा तेथे संशयास्पद मिळुन आला त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन 30 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल आणि 1 हजार रुपये किंमतीचे पाच जिवत काडतुस असा एकुण 31 हजार किंमतीचा मुददेमाल जागीच जप्त करत आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीकडे गुन्हयाचा अधिक तपास केला असता त्याने ते पिस्टल हे अरबाज रहिम शेख (वय २१) रा. सय्यदबाबानगर दर्ग्याजवळ, शिरुर ता. शिरूर जि.पुणे याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितलेले असुन त्याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे आर्म्स अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गटटे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशंवत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत, श पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस हवालदार सुद्रिक, पोलिस नाईक जगताप, पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ हाळनोर, थोरात यांनी केलेली आहे.सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास एकनाथ पाटील हे करीत आहेत.