छत्रपती संभजीनगर मध्ये गोळीबार…

क्राईम महाराष्ट्र

औरंगाबाद: छ. संभजीनगरातील एपीआय कॉर्नरवरील जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावर विलास राठोड यांचे शुभम फायनान्स ॲन्ड मल्टिसर्व्हिसेस नावाचं कार्यालय असून या कार्यालयात शुक्रवारी रात्री दोन युवक पेट्रोल पंपाकडून आले. त्यातील एकाने कार्यालयात प्रवेश केला आणि दुसरा बाहेर थांबला. कार्यालयात जाताच आलेल्या तरुणाने पिस्तुल काढून थेट विलास राठोड यांच्या दिशेने गोळी मारली. मात्र सुदैवाने ती गोळी प्रिंटरवर जाऊन लागली.

गोळीबार केल्यावर लुटारू तरुणाने गल्ल्यातील दोनशे रुपये काढून घेतले. त्यानंतर आणखी पैसे काढ असा विलास यांना दम दिला. तसेच ओरडत असतानाच पिस्टलमधून दुसरी राऊंड फायर करण्याच्या प्रयत्न केला असतानाच पिस्तुलची स्प्रिंग तुटली. त्यामुळे स्प्रिंगसह आतमधील तीन जिवंत काडतुसे कार्यालयाच्या समोर पडले. एकीकडे हा सर्व राडा सुरू असताना दुसऱ्या साथीदाराने कार्यालयाच्या समोर असलेल्या एका गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर एक युवक ठाकरेनगरच्या दिशेने पळून गेला तर दुसरा एका कारमध्ये फरार झाला.

शहरातील एका बाफना ज्वेलर्स दुकानावर जीएसटीच्या वसुली पथकाचा छापा

आर्थिक वर्षातील मार्च हा अखेरचा महिना असल्याने करवसुली यंत्रणा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रस्त्यावरील बाफना ज्वेलर्स या सराफा दुकानावर जीएसटीच्या वसुली अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. शुक्रवारी सुमारे 10 तास अधिकाऱ्यांनी दुकानातील व्यवहारांची चौकशी केली. त्यानंतर आज देखील कारवाई सुरूच असून, या काळात सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकांना दुकानातच थांबवण्यात आले. तर शुक्रवारी दुपारनंतर दुकानाचे मालक शहरात पोहोचल्यावर पुढील चौकशी करण्यास सुरुवात झाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजही ही चौकशी सुरू आहे.