शिरूर तालुक्यात युवतीवर केला बलात्कार अन्...

सोळा वर्षीय युवतीची ओळख किरण चव्हाण या युवकासोबत झाली होती, त्यांनतर किरणने युवतीसोबत वारंवार फोनवर बोलून संपर्क वाढविला होता.किरण याने लग्नाचे अमिष दाखवीत युवतीला चाकण जवळील म्हाळुंगे परिसरात पळवून नेले त्या ठिकाणी त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये युवतीला ठेवले.

शिक्रापूर: सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चैन व कानातील दागिने विकून युवतीवर बलात्कार केल्याची घटना करंदी (ता. शिरूर) येथे घडली. शिक्रापूर पोलिसांनी संशयित आरोपी किरण चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

शिक्रापूरमध्ये वाहनाच्या धडकेत जवानाचा मृत्यू

करंदी येथील सोळा वर्षीय युवतीची ओळख किरण चव्हाण या युवकासोबत झाली होती, त्यांनतर किरणने युवतीसोबत वारंवार फोनवर बोलून संपर्क वाढविला होता.किरण याने लग्नाचे अमिष दाखवीत युवतीला चाकण जवळील म्हाळुंगे परिसरात पळवून नेले त्या ठिकाणी त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये युवतीला ठेवले. युवतीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील सोन्याचे फुले किरण याने सोनाराला विकली. दरम्यानच्या काळामध्ये त्याने युवतीशी बळजबरीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्तापित करून बलात्कार केला. त्यानंतर युवतीला करंदी परिसरात आणून सोडले त्यांनतर युवतीने घरी गेल्यानंतर घडलेला प्रकार आईला सांगितला.

चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच केला पत्नीचा खून

दरम्यान, पीडित युवतीच्या आईने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे जात फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी किरण रोहिदास चव्हाण (रा. म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे मूळ रा. अहमदनगर ता. अहमदनगर जि. अहमदनगर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर व पोलिस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.

बलात्कारातील पीडित महिलेला पुन्हा धमकी

Title: shirur taluka crime news youth arrested for karandi girl cas
प्रतिक्रिया (1)
 
Suraj narawade
Posted on 28 September, 2020

A

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे