करडे घाटातील बेवारस गाडीचे रहस्य उलगडले...

एका मुलाने ही मोटार त्याच्या वडिलांच्या हत्येसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.

शिरूर: करडे घाटात अनेक दिवसांपासून एक निळ्या रंगाची बेवारस मोटार पडली होती. पोलिसांनी या बेवारस मोटारीचे रहस्य उलगडले असून, एकाला वडिलांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. एका मुलाने ही मोटार त्याच्या वडिलांच्या हत्येसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे. वडिलाच्या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावून त्यानंतर बनाव करून करडे येथील घाटात दरीत ही मोटार सोडून दिल्याची कबुली संशयीत आरोपीने दिली.

पुण्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख

मिळालेली माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी नदीपात्रात एका पत्र्याच्या कोठीमध्ये 27 ऑगस्ट रोजी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात व्यक्तीचा खून करुन मृतदेह पेटीत घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुकडी नदी पात्रात तो टाकून दिला होता. याबाबत दामु धोंडीबा घोडे (माजी सरपंच, रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पारनेर पोलिसांना याबाबत तपासादरम्यान 11 सप्टेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे मृताच्या वर्णनाशी मिळती-जुळती हरवल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातून माहिती घेतली असता सतिश सदाशिव कोहकडे (वय 49, रा. मोटारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे) हे 25 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याबाबत नोंद आढळून आली होती.

Video: बेवड्या नवऱ्याची हातपाय बांधून धुलाई...

पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मृताचे कपडे, करदोरा, हातातील दोरा व मिळून आलेल्या वस्तूंचे छायाचित्र दाखविल्यावर नातेवाईकांनी आपलीच व्यक्तीच असल्याचे ओळखले. ओळख पटविण्यासाठी मृताचे राखून ठेवलेले शरीराचे घटक तसेच नातेवाईकांच्या डीएनए चाचणी नियोजन करण्यात आले होते. पोलिसांना धागेदोरे मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून कारेगाव येथील तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरुन मृत व्यक्तीच्या मृत्यूबाबत त्याच्या मुलाकडे सखोल चौकशी केली. सुरुवातीला मुलाने माहिती देण्यात टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने सांगितले की, वडील, आईला योग्य वागणूक देत नव्हते. घरभाड्याचे व शेत मालाचे सर्व पैसे ते त्यांचे अनैतिक संबंध असलेल्या दुसर्‍या महिलेवर खर्च करत होते. यावरुन घरामध्ये वडीलांशी नेहमी वाद होत होते. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचे वडीलांशी वाद झाले. तसेच आईला मारहाण केल्याचा राग मनात धरुन मुलगा प्रदीप सतिश कोहकडे (रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याने त्याचे, मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही रा. कारेगाव) यांच्यासह इतर दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरामध्येच वडिलांच्या डोळ्यात मीरचीची पूड टाकली. शिवाय, तोंड दाबून व कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याचे सांगितले.

राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वडिलांचा मृतदेह मोटारमध्ये टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन वाहत्या पाण्यात टाकून दिला होता. त्यानंतर बनाव रचून मोटार करडे येथील घाटामध्ये खाली दरीत सोडून दिल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानुसार मुलासह त्याचे मित्र व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

Image may contain: text that says 'पोलिसकाका लस www.policekaka.com'

Title: shirur taluka karde secret of the careless vehicle police
प्रतिक्रिया (2)
 
bale chandreshwar.
Posted on 20 September, 2020

shiksha yogya ahe.pan kaidyache palan na kelyamule gunga ahe.

sagar shelke
Posted on 19 September, 2020

नाद खुळा

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे