वन्य पशु पक्षी संरक्षण समितीच्या सर्पमित्रांच्या मागणीला यश
शिरूर तालुक्यात सापाची हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेमळा येथे ३ अज्ञात व्यक्तींनी घोणस जातीच्या मोठ्या सापाची हत्या करुन त्या सापाला जाळले असल्याची घटना समोर आली असताना सदर व्यक्तींवर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी केली.शिक्रापूर: सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेमळा येथे ३ अज्ञात व्यक्तींनी घोणस जातीच्या मोठ्या सापाची हत्या करुन त्या सापाला जाळले असल्याची घटना समोर आली असताना सदर व्यक्तींवर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र वन्य पशु पक्षी संरक्षण समितीच्या सर्प मित्रांनी शिरुर वनविभागाकडे केली असताना वनविभागाने सापाची हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली आहे.
शिरुर तालुक्यात सापाची हत्या करणाऱ्यांवर कारवाई करा
सविंदणे (ता. शिरुर) येथील लंघेमळा येथे ३ लोकांनी मोठ्या घोणस जातीच्या सापाला मारुन त्याला काठीने ओढून शेजारील मोकळ्या जागेत घेऊन जात जाळून टाकल्याबाबतची फोटोसह माहिती महाराष्ट्र वन्य पशु पक्षी संरक्षण समिती पुणेचे सर्पमित्र शेरखान शेख व श्रीकांत भाडळे यांना मिळाली. त्यांनतर सदर सर्प मित्रांनी शिरुर वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे लेखी तक्रार करुन सदर साप मारणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.
चोरट्यांच्या धास्तीने परिसरातील नागरिक भयभीत
त्यांनतर शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या आदेशानुसार वनपाल चारुशिला काटे यांनी त्या ठिकाणी जात साप जाळलेल्या ठिकाणी जात पंचनामा केला असता सापाची हत्या करुन जाळले असल्याचे समोर आले होते. त्यानुसार वनविभागाने सापाची हत्या करणाऱ्या व्यक्तींची माहिती घेत बबन विठोबा लंघे, दिलीप सदाशिव लंघे, कैलास किसन गावडे (तिघे रा. लंघेमळा सविंदणे ता. शिरुर जि. पुणे) यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम कलम १९७२ नुसार गुन्हे दाखल केले असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिरुर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल चारुशिला काटे करत आहे.
ई-हक्क प्रणालीचा वापर करुन घरबसल्या करा वारसनोंदी
साप मारल्याने गुन्ह्याची पहिलीच घटना...
शिरुर तालुक्यात सापाची हत्या केल्यामुळे गुन्हे दाखल झाल्याची पहिलीच घटना घडली असुन या घटनेमुळे शिरुर तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली असुन वनविभाकडून कारवाई होत असल्याने नागरिकांनी देखील सध्या चांगलाच धसका घेतला आहे.