प्रत्येक दिव्याला सूर्य करणारा शिक्षक

पाच सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. शिक्षक ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास शिक्षण विकासातील उल्लेखनीय टप्पा आहे. प्रगल्भ विचारवंत, व्यासंगी शिक्षणतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे अभ्यासक म्हणून शिक्षक दिनानिमित्ताने त्यांच्या कार्य प्रतिभेस विनम्र अभिवादन...

पाच सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. शिक्षक ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास शिक्षण विकासातील उल्लेखनीय टप्पा आहे. प्रगल्भ विचारवंत, व्यासंगी शिक्षणतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे अभ्यासक म्हणून शिक्षक दिनानिमित्ताने त्यांच्या कार्य प्रतिभेस विनम्र अभिवादन...

शिक्रापुरातील मयत झालेल्या महिलेच्या घरातील एवढे जण बाधित...

या शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक दिवारुपी बालकाला सूर्य बनविणेचा संकल्प सोडणारा शिक्षक. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अभिनव प्रयोगशीलता याव्दारे शिक्षणाच्या महायज्ञात आपल्या श्रमाने विवेक आणि विचारांची समिधा अर्पण करणारा ज्ञानसूर्य. मुला-मुलींच्या भावविश्वात उत्तमता, संशोधन, स्वावलंबन, नैसर्गिक क्षमता, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य, अध्ययनशीलता, एकाग्रता इ. मूल्यांचे संवर्धन करणारा सामाजीक अभियंता म्हणजे प्रज्वलीत मनाचा शिक्षक. निरागस आणि निरामय मुला-मुलींचे भावना विश्व आणि व्यक्तीमत्व समृद्ध करताना प्रत्येक शिक्षकाच्या ठायी अंश रुपाने महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीमाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, ताराबाई मोडक, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील, राजर्षी शाहू महाराज आदी शिक्षण तपस्वींचा विचार सामावलेला आहे. त्यांच्या महान कार्यास आणि प्रतिभा संपन्न उपक्रमशीलतेस अभिवादन करण्याचा आजचा मंगलमय क्षण अर्थात शिक्षक दिन होय.

शिक्रापूर मध्ये फिरत्या हौदाच्या सहाय्याने गणेश विसर्जन

२१ वे शतक आणि शिक्षण
ज्ञानाधिष्ठीत अर्थव्यवस्थेत भारताला समर्थ बनविणे कामी शिक्षण व संशोधनाशी संबधित धोरणे अत्यंत महत्वाची आहेत. जून २००५ नुसार सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली "राष्ट्रीय ज्ञान आयोगाची" स्थापना झाली.

आयोगाची उद्दीष्टे
१) २१ व्या शतकातील ज्ञानविषयक आव्हानांना तोंड देउ शकेल अशी उत्कृष्ट व्यवस्था निर्माण करणे.
२) विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात ज्ञानविषयक सर्जनशीलतेला प्राधान्य देणे .
३) स्थानिक कल्पकता व संशोधनाला प्रवृत्त करून शेती, आरोग्य व उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये नवज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करणे.
४) बौद्धीक संपदा अधिकाराशी संलग्न संस्थांचे व्यवस्थापन सुधारणे.

विविध शिक्षण आयोग स्थापन झाले
१९६८, १९९२, १९९५ ( यशपाल समिती )
राष्ट्रीय ज्ञान आयोग-राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (२००५)
राज्य अभ्यासक्रम आराखडा (२०१०)
याव्दारे मार्गदर्शक तत्वे, नवीन ज्ञान आणि कौशल्य विकासावर भर देण्यात आला.  शिक्षण सर्वदूर पोहचले. हजेरी ९५% मात्र गळती ? स्थगन ? भाषा गणित विषयातील मूलभूत कौशल्ये ? अनुसुचित जाती- जमाती 'अल्पसंख्याक मुला-मुलींचे शिक्षण? आर्थिक दृष्टया कमकुवत, आदिवासी-डोंगराळ भागातील शिक्षण 'ग्रामीण आणि भटक्या समाजासाठीचे शिक्षण यासाठी बरेच काही करावे लागेल. खाजगी शाळांकडे पालकांचा ओढा आहे. मात्र वरील घटकांना दर्जेदार शिक्षण मिळेल अशी व्यवस्था निर्माण करणे हे शासकीय, निमशासकीय, खाजगी व्यवस्थापन मंडळासमोर एक मोठे आव्हान आजही कायम आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात खाजगी विद्यापीठे, परदेशी शिक्षण मंडळे, विद्यापीठे यांची भूमिका अत्यंत महत्वाचे आहे.

शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिक्षण आणि कौशल्य विकास
२१ व्या शतकातील चिकीत्सक आणि अभिनव विचारसरणी ही कौशल्य विकासाची जननी आहे. फक्त गुणवत्तेवर भर देताना अध्ययन निश्चीती स्तर व मूलभूत वाचन कौशल्ये याबाबत योग्य प्रगती आपण साध्य करताना दिसत नाही. सन १९९२ पासून जागतीकीकरणाला सुरुवात झाली. शिक्षणातील राष्ट्रीय उद्दीष्टे, धोरणे, दर्जेदार अभ्यासक्रम, भाषा विषयक धोरणे, तंत्रस्नेही अध्यापन यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक घडला पाहीजे ही भूमिका स्पष्ट झाली. त्याचे अवलोकन करणे गरजेचे आहे. व्यवसायाभिमुख , कौशल्या भिमुख अभ्यासक्रम असतानाही केवळ नोकरी साठी शिक्षण या भूमिकेच्या आग्रहामुळे आपण बाजारशरण वृत्तीचा स्वीकार करताना दिसत आहोत. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे 'श्रममेव जयते' हे मूल्य याचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात दिसले पाहीजे . ६४ कलांचा अभ्यास आणि उपयुक्तता समजावून घेणे महत्वाचे आहे .

विविध योजना आणि शिक्षण गुणवत्ता
एकीकडे गुणवत्तेचा आग्रह आणि दुसरीकडे योजनांचा ताण अशी परिस्थिती आहे. केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा मोहिम, माध्यान्ह आहार योजना, शिक्षण हक्क कायदा, नॅशनल स्कील्स डेव्हलपमेंट मिशन, राष्ट्रीय उच्च स्तर शिक्षण अभियान, शालेय व्यवस्थापन समिती, व्यवस्थापन व विकास समिती, पोषण आहार समिती अशा अनेक कार्यक्रमांची अंमलबजावणी यामुळे अध्यापनाचा मूळ हेतू बाजूला सरकताना दिसतो. या योजनांमुळे आपण पुढे जाताना दिसत असलो तरी मूलभूत कौशल्ये, गुणवत्ता मात्र वाढताना दिसत नाही. कोणताच वर्ग लेखन, वाचन, श्रवण, संभाषण कौशल्यात १०० टक्के साक्षर दिसत नाही. हे शिक्षण व्यवस्थेतील मोठे आव्हान म्हणून आम्हांस स्विकारावे लागेल.

मृत मोर वनविभागा अभावी २४ तास पडून

शिक्षणाचे सामर्थ्य ज्ञानप्राप्ती
ज्ञानाचे आकलन व्हावे त्यासाठी काही उद्दीष्टे साध्य करावी लागतील.
१) समृद्ध ग्रंथालये
हल्ली फक्त पाहणेच वाढले आहे. संकेतस्थळावरून जाताना वाचन कमी झाले आहे. ग्रंथालये म्हणजे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्ञानाची केंद्रे, ज्ञानाची ही प्रवेशव्दारे आधुनिक व्हावीत.

२) भाषा विषयक कौशल्ये
आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी उद्योग व नोकरी क्षेत्रात अत्यंत महत्वाची. इंग्रजीची भाषा प्रयोगशाळा, राज्य-राष्ट्रीय भाषेचे साहीत्य सदन, पूरक साहीत्य-प्रसार माध्यमांचा अध्ययन-अध्यापनात उपयोग गरजेचा आहे.

३) डिजीटल माध्यमांचा वापर
विविध डिजीटल संसाधने, देशातील शेतकी, वैधकीय, तांत्रिक संस्थानी डिजीटल साहीत्या व्दारे विचारांचे आदान-प्रदान करावे. विविध पोर्टल्स व्दारे माहीती संकलीत करुन ई-मेल गट, फोरम, व्हॉट्सअप, फेसबुक समूह या व्दारे संकलीत ज्ञान आणि सेवांचा शिक्षणात समावेश करावा. भारतीय जल पोर्टल्स व ऊर्जा पोर्टल्स यांचे कार्य महत्वाचे आहे .

वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका पत्रकाराला गमवावे लागले प्राण...

ज्ञानसंकल्पना
शालेय शिक्षणाचा दर्जा, व्यवस्थापन, शिक्षकांना योग्य प्रशिक्षण यासाठी चर्चासत्रे व परिसंवादाचे आयोजन व्हावे .

शासन-प्रशासनाकडून अपेक्षा
१) विना-अनुदानित शाळांना वेळेतच अनुदान द्यावे.
२) वेतन-वेतनेतर अनुदान ही शिक्षणाच्या गुणात्मक व संख्यात्मक बाब आहे.
३) दर्जा व भौतीक संसाधने यात तडजोड करू नये.
४) शासकीय विभाग, व्यवस्थापन प्रणाली या मध्ये समन्वय असावा.
५) शिक्षकांना अध्यापनेतर जबाबदाऱ्यांमुळे गुणवत्तेवर परिणाम होतो.
६) त्यांना अध्यापनात व अध्ययनात सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षणे सहज-सुलभ करावीत.
७) केंद्र आणि राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावेत.
८) तुकड्या-तुकड्यांनी घेतलेले निर्णय सर्वंकष शिक्षण विकासाची जागा घेउच शकत नाहीत.

जग बदलण्याचे सामर्थ्य शिक्षकांत
एकूणच शिक्षक हा समाजाचा अभियंता आहे. आजमितीस ऑनलाईन शिक्षण कार्य पार पाडत तंत्रस्नेही कार्याचा अविष्कार म्हणून शिक्षक बांधव प्रगत झाले आहेत. विद्यार्थ्याना ज्ञानार्थी बनविणारा हा घटक नेशन बिल्डर म्हणून काम पार पाडतो आहे. शिक्षण तपस्वी, राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्य आणि नागरिकत्वाचे संवर्धन करणारे तमाम शिक्षक बंधू-भगिनी हे राष्ट्र विकासाचे निर्माते आहेत. आजच्या शिक्षक दिनी शिक्षण आणि संस्कारांचा ध्वज उचलून धरणाऱ्या या शिक्षण प्रेमींना मनापासून धन्यवाद देतो. शिक्षक दिना निमित्ताने विचारातून-विकासाकडे झेपावण्या साठी सुयश व्यक्त करतो.

श्वसनाचा त्रास झाल्याने एका महिलेचा मृत्यू...

आपल्या देशातील उद्योगपती, राजकीय नेते, खेळाडू, कलाकार, शास्त्रज्ञ, समाजसेवक यांचे आपण नेहमीच कौतुक करतो. पण या सगळ्यांच्या जडण-घडणीमागे त्यांच्या शिक्षकांचा हातभार आहे याची जाणीव कायम रहावी. भारताच्या सर्वोच्च नेत्यांपैकी डॉ. राधाकृष्णन, वेंकटरामन, डॉ. अब्दुल कलाम, डॉ. शंकर दयाळ शर्मा या राष्ट्रपतींनी उच्च पदावर आल्यावरही शिक्षकांचे महत्व कायम केले आहे. आम्हा सर्वांना त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे.

प्रा. रामदास थिटे प्राचार्य : श्री. संभाजीराजे विद्या संकुल सचिव- शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ मो ९८९०९९८९९२

Title: The teacher who makes every lamp sun
प्रतिक्रिया (1)
 
रामराव भिमराव पाडुळे
Posted on 5 September, 2020

शिक्षणक्षेत्रातील आजचे वास्तव.. मागील काळातील शिक्षण क्षेत्रातील घडामोडी.. उपाययोजना...यांचा खूप चांगला लेखाजोखा मांडला आहे... भविष्याचा वेध घेऊन.. शासनाकडून च्या अपेक्षा...शिक्षकांचे प्रयत्न... भविष्यातील आव्हाने.. डिजिटल शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे योगदान..थिटे सर खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेख

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे