लांडग्यांच्या कळपाने चढवला शेळ्यांवर हल्ला अन्..

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी.

इंदापूर: निमगांव केतकी येथील कचरवाडी गावात लांडग्याच्या कळपाने अचानक शेतकऱ्याच्या शेळ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात शेळ्यांची नऊ लहान पिल्ले जागीच ठार केली असून, नऊ पिल्ले पळवून नेली आहेत.

...म्हणुन आमदार अशोक पवारांनी स्वतः चालवली गाडी

माणिक दत्तु कचरे या मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच कुंडलिक कचरे यांनी वन विभागाला कळवले. इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या सूचनेनुसार सर्व घटनेचा पंचानामा केला. या घटनेत कचरे यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना शासनाच्या वतीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

सणसवाडीच्या युवकाची युके मध्ये शिक्षणासाठी निवड; पण...

May be an image of text that says

जातेगाव खुर्द मध्ये १२० कुटुंबांना किराणा व अन्नधान्याचे वाटप

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी मेंढपाळ व शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात काळजी घ्यावी. आपल्या पाळीव जनावरांना बंदिस्त व सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: A herd of wolves attacked the goats at indapur taluka pune