आमदार अशोक पवार यांचे सणसवाडीत अनोखे स्वागत

पंडित दरेकर कुटुंबियांच्या स्वागताने आमदार पवार गेले भारावून

सणसवाडी (ता. शिरुर) येथे नुकतेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असताना या कार्यक्रम प्रसंगी आमदार अशोक पवार याचे आगमन झाले असताना सणसवाडी ग्रामस्थ तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर कुटुंबियांच्या वतीने आमदार अशोक पवार यांचे अनोखे स्वागत करण्यात आले आहे.

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे नुकतेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून तब्बल ५ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असताना या कार्यक्रम प्रसंगी आमदार अशोक पवार याचे आगमन झाले असताना सणसवाडी ग्रामस्थ तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर कुटुंबियांच्या वतीने आमदार अशोक पवार यांचे अनोखे स्वागत करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आलेल्या ५ कोटी रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आमदार अशोक पवार यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमसाठी आमदार अशोक पवार उपस्थित राहणार असल्याने सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने गावामध्ये अनेक ठिकाणी स्वागत फलक तसेच गावातील प्रवेशद्वारामध्ये स्वागत कमान लावण्यात आलेली होती.

सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार अशोक पवार याचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने आमदार अशोक पवार यांच्यावरील प्रचार गीत वाजवीत फटाक्यांची आतषबाजी करत आमदार अशोक पवार यांचे स्वागत करण्यात आले तर यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांची कन्या आलिशा दरेकर, हर्षला दरेकर व ऋतुजा दरेकर, वंदना दरेकर यांच्या वतीने आमदार अशोक पवार हे त्यांच्या वाहनातून उतरताच मोठ्या प्रमाणात फुलांची उधळण करत आमदार अशोक पवार यांचे स्वागत करण्यात आले, याप्रसंगी सणसवाडीच्या सरपंच सुनंदा दरेकर, उपसरपंच विजयराज दरेकर, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा दरेकर, रोहिणी भुजबळ, स्नेहल भुजबळ, गिता भुजबळ, शशिकला सातपुते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, सागर दरेकर, माजी सरपंच आशा दरेकर, माजी सरपंच रमेश सातपुते, सुरेश हरगुडे, शिवाजी दरेकर यांसह आदी उपस्थित होते, दरम्यान आमदार अशोक पवार यांच्या करण्यात आलेल्या अनोख्या स्वागताने आमदार अशोक पवार देखील भारावून गेले.

दरम्यान यावेळी अनेक दिवसांपासून आमदार अशोक पवार यांच्या वाहनाचे सारथ्य करण्याची इच्छा असलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर यांची कन्या आलिशा दरेकर हिने मला आपल्या वाहनाचे सारथ्य करण्याची इच्छा असून आपण माझी इच्छा पूर्ण करावी, असे आलिशा दरेकर हिने अशोक पवार यांना म्हटले असताना आमदार अशोक पवार यांनी देखील आलिशा हिचे वय तसेच तिच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे का याची चौकशी करत आपल्या वाहनाचा ताबा आलिशा दरेकर हिच्याकडे देत आलिशा चालवीत असलेल्या वाहनातून आपला काही प्रवास करत आलिशा हिला वाहन चालविण्याबाबत काही मार्गदर्शक सुचना देखील यावेळी आमदार अशोक पवार यांनी दिल्या आहेत, तर सणसवाडी ग्रामस्थ तसेच पंडित दरेकर यांच्या कुटुंबीयांनी केलेले माझे स्वागत नेहमी माझ्या स्मरणात राहतील अशा भावना आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केल्या.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Aamdar Ashok Pawar Yanche Sanswadit Unique welcome