आमदार अ‍ॅड अशोक पवारांना जीवे मारण्याची धमकी

निनावी पत्राद्वारे धमकी दिल्याने तालुक्यात खळबळ

पुणे जिल्ह्यातील शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांच्यासह कुटुंबियांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याने पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

शिरुर: पुणे जिल्ह्यातील शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांच्यासह कुटुंबियांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याने पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. शिरुर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे हे पत्र आले असून या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत.

शिरुर तालुक्यातील या गावातील विकास कामांच्या उदघाटनाला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी

मोटेवाडी पाझर तलावात काटेरी झुडपांचे साम्राज्य  

काही वर्षापूर्वीच शिरुरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची दिवसा ढवळ्या भर चौकात हत्या करण्यात आली होती. या निनावी पत्रात आमदार अशोक पवार यांचाही महेंद्र मल्लाव करण्याची धमकी देण्यात आली असुन आमदार पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची भाषा या पत्रात वापरण्यात आल्याने याचे तालुक्यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकप्रतिनिधी बाबत जर, अशी भाषा वापरली जात असेल तर लोकप्रतिनिधीनी कामे कशी करायची...? असे सांगत पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे.     

वाचनालय म्हणजे शब्दांचे माहेर: ज्ञानेश्वर कटक

शिरुर तालुक्यातील भाजपाचा पदाधिकारी लाच घेतल्याप्रकरणी अटक

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Aamdar Ashok Pawarana Jeeve Maranyachi Threat