अभिनयात येण्यापूर्वी महिमा चौधरी करायची हे काम...

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये महिमा चौधरीने केवळ तिच्या अभिनयानेच नाहीतर आपल्या मोहक सौंदर्यानेही रसिकांची भरघोस पसंती मिळवली आहे. शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. तिचा हा पहिलाच सिनेमा होता.

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये महिमा चौधरीने केवळ तिच्या अभिनयानेच नाहीतर आपल्या मोहक सौंदर्यानेही रसिकांची भरघोस पसंती मिळवली आहे. शाहरुख खानसोबत 'परदेस' सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. तिचा हा पहिलाच सिनेमा होता. ती सगळ्यांत आधी पेप्सीच्या जाहिरातीत आमिर खान आणि ऐश्वर्या रायसोबत दिसली होती. ती एका व्हीजे चॅनेलमध्ये काम करायची. या दरम्यान, दिग्दर्शक सुभाष घई यांची तिच्यावर नजर पडली आणि तिला परदेस सिनेमाची ऑफर दिली.

बॉलीवूडमध्येही 'प्राची देसाई'चा जलवा

परदेस' सिनेमासाठी, सुभाष घई हे अभिनेत्रीच्या शोधात होते. पण महिमाला पाहताच त्यांचा शोध संपला. महिमापूर्वी, या भूमिकेसाठी तब्बल ३००० ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या आणि त्यातून हवा तसा चेहरा मिळत नव्हता. महिमाला ही संधी देण्यात आली. तिने ही भूमिका चोख बजावली आणि तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. सर्वत्रच तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

यानंतर तिला चांगल्या चांगल्या सिनेमाच्या ऑफर्स मिळायला लागल्यात.'दाग', 'धड़कन', 'कुरुक्षेत्र', 'खिलाड़ी ४२०', 'साया', 'बागबान', 'एलओसी कारगिल' आणि 'गुमनाम' सिनेमात झळकत तिने इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. तिच्याफिल्मी करिअरप्रमाणे खासगी आयुष्यातल्या अफेअरमुळेही ती जास्त चर्चेत राहिली. लिअँडर पेससोबत तिच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या. पण त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही.

लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं...? वाचा प्रियंकाचं उत्तर

यानंतर, बॉबी मुखर्जीची महिमा चौधरीच्या आयुष्यात एंट्री झाली आणि महिमा पुन्हा प्रेमात पडली. बॉबी मुखर्जी महिमाच्याच मित्राचा भाऊ होता. दोघांमध्ये ओळख झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. बॉबी आणि महिमा यांनी २००६ मध्ये लग्न केले. पण हे लग्न फक्त ७ वर्षे टिकू शकले. २०१३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. बॉबी आणि महिमाला एक मुलगी आहे. अरिहाना असे मुलीचे नाव आहे. अरिहाना गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सर्वांचीच आकर्षण ठरत असते. तिच्या क्यूटनेसच्या चर्चा सर्वत्र आहेत आणि ती हळूहळू लोकप्रिय स्टार किड्सच्या यादीतही सामील होत आहे.

कान्हुरच्या पाणी प्रश्नासाठी ग्रामस्थांनी घेतली वळसे पाटलांची भेट...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Abhinaat Yenyapurvi Mahima Choudhary Karaichi Hey work