Video: सर्पमित्रांकडून चक्क १८ नागाच्या पिलांना जन्म...

वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांनी उबवली नागाची अंडी

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्रांनी पकडलेल्या विषारी नागाने १९ अंडी घातलेली असताना सदर अंड्यातून कृत्रिम पद्धतीने तब्बल १८ नागाच्या पिलांना जन्म देण्यात वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांना यश आले असून (दि. १०) जुलै रोजी सर्व पिलांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्रांनी पकडलेल्या विषारी नागाने १९ अंडी घातलेली असताना सदर अंड्यातून कृत्रिम पद्धतीने तब्बल १८ नागाच्या पिलांना जन्म देण्यात वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या सर्पमित्रांना यश आले असून (दि. १०) जुलै रोजी सर्व पिलांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.

श्रीकांत भाडळे यांची तालुकाध्यक्ष निवडीबद्दल कलाशिक्षक संघाच्या वतीने सन्मान...

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, शेरखान शेख, शुभम वाघ यांनी मे महिन्याच्या सुरुवातीला एक मोठा कोब्रा जातीचा विषारी नाग पकडून बरणीमध्ये ठेवून घरी आणला असता सदर नागाने चक्क बरणीमध्येच १९ अंडी घातली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले. यावेळी त्यांनी तातडीने शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना माहिती देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अंडी विशिष्ठ अशा मातीमध्ये कुत्रिम पद्धतीने उबविण्यास ठेवली.

शिरूर तालुक्यातील संरपंचांची फसणूक करणारा ठकबाज ताब्यात...

दरम्यान वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, शेरखान शेख, शुभम वाघ, बाळासाहेब मोरे, अमोल कुसाळकर, पूजा बांगर यांनी वेळोवेळी सदर अंड्यांची पाहणी सुरु ठेवली. त्यांनतर तब्बल ७० दिवसांनी त्या अंड्यांतून १८ पिल्ले जन्मलेली असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले. त्यांनतर (दि. १०) जुलै रोजी शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना माहिती देत शिरुर वनविभागाच्या वनरक्षक सोनल राठोड यांच्या उपस्थितीत सर्व नागाची पिल्ले निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: About 18 cobras were born from snake friends