शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या किसान खात्यातून चक्क २ लाख लंपास

कोरेगाव भीमा येथील PDCC बँकेतील खळबळजनक प्रकार

शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले असून पावसाने देखील दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होत चाललेला असताना शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बँकेच्या किसान खात्यातून तब्बल २ लाख रुपये लंपास झाल्याची घटना घडली आहे.

शिक्रापूर: शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलेले असून पावसाने देखील दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त होत चाललेला असताना शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बँकेच्या किसान खात्यातून तब्बल २ लाख रुपये लंपास झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची सणसवाडीमध्ये पुन्हा कारवाई...

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

आपटी (ता. शिरुर) संजय गोसावी या शेतकऱ्याचे कोरेगाव भीमा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खाते असुन सदर बँकेच्या खात्यातून किसान क्रेडीट कार्ड व डेबिट कार्ड गोसावी हे वापरत असताना एप्रिल २०२१ मध्ये गोसावी यांचे किसान कार्ड गहाळ झाल्याने त्यांनी बँकेमध्ये जात बँकेला माहिती देऊन हरविलेले किसान कार्ड बंद करुन टाकले. त्यांनतर (दि. १) जून २०२१ रोजी गोसावी यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यातून २० हजार रुपये काढून घेतले. त्यावेळी गोसावी यांच्या खात्यात २ लाख ६ हजार रुपये शिल्लक राहिलेले होते. मात्र (दि. ५) जून २०२१ रोजी गोसावी बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना त्यांच्या बँक खात्यातून २ लाख रुपये गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी खात्याचा तपशील तपासला असताना बँकेच्या खात्यातून ३ जून २०२१ ते ११ जून २०२१ रोजी बँकेच्या खात्यातून वेळोवेळी असे तब्बल २ लाख रुपये गायब झाल्याचे निदर्शनास आले.

पिंपळे जगताप मधून कत्तलीला चाललेल्या चौदा गोमातेंना जीवदान

याबाबत संजय बबन गोसावी (वय ५०) रा. आपटी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: About 2 lakh lampas from the farmer s account of a farmer in