पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा गोव्यात मृत्यू...

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि मित्र शुभम देडगे मागील बऱ्याच वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या या ओळखीच रुपांतर प्रेमात झाले होते.

पुणे: गोव्यातील बागा-कलंगुट येथील एका पुलावरून चारचाकी गाडी खाडीत कोसळल्याने पुण्यातील अभिनेत्रीसह तिच्या मित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 20) पहाटे घडली आहे. या घटनेने पुणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

यशच्या खऱ्या आयुष्यातील गौरीला पाहिलंत का...?

ईश्वरी देशपांडे आणि शुभम देडगे असे अपघातात मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. मृत शुभम आणि ईश्वरी बुधवारी पुण्यातून गोव्याला फिरायला गेले होते. दरम्यान, सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास बागा येथील अरुंद रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी सरळ खाडीत जाऊन कोसळली. अपघात झाल्यानंतर ईश्वरी आणि शुभम सेंट्रल लॉकमुळे दोघंही गाडीतच अडकले. त्यानंतर नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच एका हिंदी आणि मराठी चित्रपटाचे चित्रीकरण केले होते.

अपघातग्रस्त कार... (फोटो-पुणेकर न्युज)

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि मित्र शुभम देडगे मागील बऱ्याच वर्षांपासून दोघं एकमेकांना ओळखत होते. त्यांच्या या ओळखीच रुपांतर प्रेमात झाले होते. पुढच्या महिन्यात दोघेही साखरपुडा करणार होते. दरम्यान हा अपघात झाल्याने त्यांचा संसार सुरू होण्यापूर्वीच मोडला आहे. मृत ईश्वरी ही पाषाण-सूस परिसरात वास्तव्याला होती. तर शुभम हा नांदेड सिटी परिसरातील रहिवासी होता.

चक्क आता कोर्टात रंगणार राज विरुद्ध शिल्पाचा सामना...?

ईश्वरीने काही दिवसांपूर्वी तिची भूमिका असलेल्या मराठी आणि एका हिंदी चित्रपटाच चित्रीकरण पूर्ण केले होते. पण या चित्रपटाची प्रदर्शनपूर्वीची काही कामं अद्याप बाकी होती. ईश्वरीला लहानपणापासून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची आवड होती. त्यामुळे ती या क्षेत्राकडे वळली होती. पण नियतीने तिची सर्व स्वप्न हिरावून घेतली.

May be an image of 10 people, people standing and text that says 'कारेगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी संदिप विश्वासराव नवले पाटील यांची निवड झाल्याबद्दल हा्िकिनेद शुभेच्छुक शुभमभैय्या नवले आणि मित्र परिवार'

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: actress ishwari deshpande and her friend shubham degde died