प्रसिद्ध अभिनेत्रीने भावाची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे अन्..

शनाया हिने सख्खा भाऊ राकेश याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करून विविध ठिकाणी फेकले होते.

कर्नाटक : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शनाया काटवेला हिला भावाच्या हत्येच्या आरोपात हुबळी पोलिसांनी अटक केली आहे. तपासादरम्यान तिने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनाही धक्का बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनाया हिने सख्खा भाऊ राकेश याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करून विविध ठिकाणी फेकले होते. या हत्येमध्ये आणखी चार जणांचा समावेश आहे. राकेशचं कापलेलं डोकं देवरागुडीहलाच्या जंगलात सापडले. तर शरीराचे बाकी तुकडे हुबळी आणि गदग रोडवर सापडले. धारवाड़ जिल्हा पोलिसांनी आणखी 4 संशयित आरोपींची ओळख पटवली आहे. नियाज अहमद कटिगार (वय 21), तौसीफ चन्नापुर (वय 21), अल्ताफ मुल्ला (वय 24) आणि अमन गिरानीवाले (वय 19) अशी त्यांची नावे आहेत.

राकेशची हत्या घरात 9 एप्रिल रोजी झाली होती.  आरोपीने गळा दाबून राकेशची हत्या केल्याची माहिती आहे. नियाज अहमद आणि इतरांनी एका दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे गेले आणि ते शहरातील विविध ठिकाणी फेकले. शनायाला गुरुवारी अटक करण्यात आली आणि तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. शनायाने आपल्या अभिनय कारकिर्दीती सुरुवात राघवंका प्रभूद्वारा निर्देशित 2018 मध्ये चित्रपट इदम प्रेमम जीवनम या कन्नड चित्रपटापासून केली आहे.

करीना कपूरची नणंद सबा आहे इतक्या कोटींची मालकीण; एकदा पहाच...

Title: actress shanaya arrested for brother murder ase
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे