अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात चाहत्याचा राडा; वडील जखमी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पिंपरी चिंचवडमधील घरी एका व्यक्तीने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला.

पुणे: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या चाहत्याने तिच्या पिंपरी चिंचवडमधील घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत तिचे वडील जखमी झाले आहेत.

देशाच्या मदतीसाठी धावली ही अभिनेत्री अन...

Image

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पिंपरी चिंचवडमधील घरी एका व्यक्तीने जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने मी सोनालीचा चाहता असून, मला तुमच्या घरात राहू द्या, असे म्हणत घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांनी त्या अज्ञात व्यक्तीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनतर त्यांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, सोनालीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. ती आपल्या पतीसोबत सध्या दुबईमध्ये आहे. तिच्या गैरहजेरीत एका व्यक्तीने घरी येऊन हा सगळा गोंधळ घातला आहे. त्यामुळे सोनालीसुद्धा चिंतेत आहे. कलाकारांचा विविध चाहत्यांशी संपर्क येत असतो. त्यांना हाताळता हाताळता त्यांच्या नाकी नऊ येत असते. अनेक सामाजिक ठिकाणी त्यांना अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागते. त्यांना या सर्वांची सवयदेखील झालेली असते. मात्र, थेट घरी येऊन अज्ञात व्यक्तीने असा गोंधळ घातल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Image

Title: actress sonali kulkarni her pimpri chinchwad home one arrest
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे