अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिने स्वत: एक ट्टीट करत ही माहिती दिली आहे. उर्मिलाला कोव्हिडची काही लक्षणं दिसू लागल्याने तिने कोरोना चाचणी केली असुन तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिने स्वत: एक ट्टीट करत ही माहिती दिली आहे. उर्मिलाला कोव्हिडची काही लक्षणं दिसू लागल्याने तिने कोरोना चाचणी केली असुन तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर उर्मिलाने स्वत:ला क्वारंटीन केले आहे.

हिवरे कुंभार मध्ये रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

उर्मिलाने एक ट्वीट केले असून त्यात तिने, 'मी कोव्हिडची टेस्ट केली होती जी पॉझिटिव्ह आलीय. माझी प्रकृती ठिक असून मी स्वत:ला होम क्वारंटीन केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने त्वरित कोरोना चाचणी करुन घ्यावी ही विनंती.' असे तिने म्हटले आहे. तसेच उर्मिलाने दिवाळीच्या सणामध्ये प्रत्येकाने काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.

शिरुर तालुक्यातील शिक्षकांकडून आदिवासी मुलांची दिवाळी गोड

उर्मिलाच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. उर्मिला मातोंडकर आधी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री निशा रावलने तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील नुकतेच कोरोना मुक्त झाले आहेत.

जातेगाव बुद्रुकमधून जेष्ठ महिलेला फसवत दागिना लांबविला

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Actress Urmila Matondkarla Coronachi Lagan