बच्चू कडूंनी वेशांतर करून मारला फेरफटका; पण...

बच्चू कडू यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला.

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज (सोमवार) वेशांतर अकोला शहर व पातूर शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान त्यांनी कारभाराची माहिती घेतली. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वस्त धान्य दुकानांही भेटी देऊन धान्य वितरणात काळा बाजार होतो की कसे, याबाबत माहिती घेतली.

अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा...

बच्चू कडू यांनी युसुफखाँ पठाण हे बनावट नाव धारण करून महानगरपालिकेचा फेरफटका मारला. विविध विभागांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा त्यांच्या कक्षात नसल्याने त्यांच्या स्विय सहायकाशी त्यांनी संवाद साधला. विशेष म्हणजे एकही मनपा कर्मचारी बच्चू कडू यांना ओळखू शकला नाही. ते निघून गेल्यानंतर मात्र पालकमंत्री वेश पालटून आले होते, हे समजताच मनपा परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

त्यानंतर बच्चू कडू यांनी आपला मोर्चा पातूर शहराकडे वळविला. त्या ठिकाणीही शासकीय कार्यालयांना भेटी देऊन कारभाराची पाहणी केली. दुकानांमध्ये जाऊन गुटख्याची विक्री होते की कसे याबाबतही माहिती घेतला. स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली. यामुळे बच्चू कडू यांची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी कार्यालय उदघाटन कार्यक्रमातील गर्दी प्रकरणी गुन्हा दाखल

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: akola news mla bacchu kadu change dress and visit offices