कारेगावच्या विकासकामांमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आरोप

कारेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये माजी सरपंच अनिल नवले यांची सत्ता होती. त्यावेळेस गावात अंदाजे ५० कोटी रुपयांची विविध विकासकामे झाली. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असुन याची १५ दिवसात सखोल चौकशी करुन कठोर कार्यवाही व्हावी आणि ग्रामपंचायतला खाजगी ऑडिट करण्याची परवानगी मिळावी.

रांजणगाव गणपती: कारेगाव (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतमध्ये ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०२० मध्ये माजी सरपंच अनिल नवले यांच्या कार्यकाळात झालेल्या अंदाजे ५० कोटी रुपयांच्या विकासकामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामाची सखोल चौकशी करुन खाजगी ऑडिट करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी सरपंच, उपसरपंच यांच्यासहीत ७ ग्रामपंचायत सदस्यांनी निवेदनाद्वारे शिरुरचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्याकडे केली आहे.

यापुर्वी कधीच असल घाणेरड राजकारण झालं नाही...

कारेगाव (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीत अतिक्रमण...

कारेगाव येथील ग्रामपंचायतमध्ये माजी सरपंच अनिल नवले यांची सत्ता होती. त्यावेळेस गावात अंदाजे ५० कोटी रुपयांची विविध विकासकामे झाली. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असुन याची १५ दिवसात सखोल चौकशी करुन कठोर कार्यवाही व्हावी आणि ग्रामपंचायतला खाजगी ऑडिट करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी उपसरपंच अजित कोहकडे यांनी केली आहे. तसेच १५ दिवसात भ्रष्टाचाराची चौकशी न केल्यास सरपंच व उपसरपंच यांच्यासह ७ सदस्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

सत्य हे नेहमी कटूच असते:- माजी सरपंच अनिल नवले

दारुण पराभवामुळेच त्यांनी केले बिनबुडाचे आरोप...

याबाबत शिरुरचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सरपंच, उपसरपंच आणि ग्रा पं सदस्य यांनी मागणी केल्याप्रमाणे कारेगाव ग्रामपंचायतचे ऑगस्ट २०१५ ते ऑगस्ट २०२० या ५ वर्षाचे सरकारी ऑडिट करण्यात येईल तसेच त्यात कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. 

सत्य हे नेहमी कटूच असते:- माजी सरपंच अनिल नवले

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Alleged corruption of crores in development works in Karegao