करंदीत राजखमी ष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश...

करंदी (ता. शिरुर) येथील ढोकले वस्ती येथील एका शेतामध्ये आढळून आलेल्या जखमी असलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले असल्याची घटना घडली तर सदर मोराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून मोराला कात्रज येथील प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर: करंदी (ता. शिरुर) येथील ढोकले वस्ती येथील एका शेतामध्ये आढळून आलेल्या जखमी असलेल्या भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोराला जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले असल्याची घटना घडली तर सदर मोराला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले असून मोराला कात्रज येथील प्राणी संग्रहालयात दाखल करण्यात आले आहे.

 

शिक्रापूर च्या युवकाची शेअरमार्केटच्या आमिषाने फसवणूक

करंदी (ता. शिरुर) येथील ढोकलेवस्ती येथे ७ जून रोजी सायंकाळी उशिरा नवनाथ ढोकले यांच्या शेतामध्ये एक भलामोठा मोर निपचित पडलेला असल्याचे आढळून आले. दरम्यान माहिती महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे प्राणीमित्र शेरखान शेख यांना मिळताच महाराष्ट्र वन्य पशु पक्षी सामाजिक संस्थेचे प्राणीमित्र श्रीकांत भाडळे, अमोल कुसाळकर यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत जखमी मोराला ताब्यात घेत त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

मंगलदास बांदल यांची येरवडा कारागृहात रवानगीचे आदेश

दरम्यान शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना याबाबत माहिती दिली असता वनरक्षक अभिजित सातपुते, वनमजूर आनंदा हरगुडे, घोलप यांनी शिक्रापूर येथे धाव घेत जखमी मोराला ताब्यात घेऊन त्या मोराला पुढील उपचारासाठी कात्रज येथील प्राणी संग्रहालयात हलविले, तर यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी प्राणीमित्रांचे आभार मानले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Animal friends succeed in saving the life of the national bi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे