जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या शुभेच्छांना अण्णा हजारेंनी कसे उत्तर दिले पाहा...

सडेतोड उत्तर देताना अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांनाच उलट सवाल केला आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?.

नगर: राज्याचे गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता अण्णा हजारे यांनीही तेवढ्याच खोचक शब्दांत आव्हाडांना उत्तर दिले आहे.

जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

जितेंद्र आव्हाडांनी शुभेच्छा देताना म्हटले होते की, प्रिय अण्णा.... प्रचंड महागाई, पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव, ढासळती अर्थव्यवस्था, कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्य व्यवस्था, वाढती सामाजिक दरी, चीन सोबत सीमेवरील तणाव यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता.

यावर सडेतोड उत्तर देताना अण्णा हजारेंनी जितेंद्र आव्हाडांनाच उलट सवाल केला आहे. अण्णा हजारे म्हणाले की, तुम्ही तर मंत्री आहात, मग तुम्ही काय करताय?.
मी एक सामान्य माणूस आहे. जनतेची सेवा करतो. पण तुम्ही तर मंत्री आहात, या प्रश्नांसाठी मग तुम्ही काय केले? प्रत्येक प्रश्नासाठी हजारे यांनीच आंदोलन करावे का? तुम्हीही जनतेचे सेवक आहात, मग तुम्ही जनतेसाठी काम का करीत नाही?, असे सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित करत आव्हाडांना शुभेच्छांवर सडेतोड उत्तर दिले आहे.

May be an image of text that says

सणसवाडीच्या युवकाची युके मध्ये शिक्षणासाठी निवड; पण...

शालेय मुलांच्या मदतीसाठी पुढे येणे गरजेचे; कुसुम मांढरे

वरुडेमधील मित्राच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिला मदतीचा हात!

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: anna hazare replied on birthday wishes given by jitendra awh