मनसेच्या 'इंजिन'ला जोडला भाजपचा डबा; कुठे तो पाहा...

जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे.

पालघर : पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनीच याबद्दल माहिती दिली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरू आहे, असंही जाधव म्हणाले. तर पालघरचे भाजपचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्या अखेर आले यश

कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अखेरीस पालघरपासून या युतीला सुरुवात होणार आहे.

दुसरीकडे, आता पुणे महापालिकेची निवडणूक होत आहे. पुण्यात भाजप आणि मनसेची युती व्हावी, अशी चर्चा सुरू आहे. भाजपच्या नेत्यांनी उघडपणे युतीचे संकेत दिले आहे. मात्र, अद्याप राज ठाकरे यांनी युतीबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. योग्य वेळी निर्णय घेणार, असे राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना स्पष्ट केले होते. त्यामुळे पालघरमध्ये युती झाल्यानंतर नाशिक आणि पुण्यातही युती होणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: announcement of bjp mns alliance for zilla parishad panchaya