'शिरुर तालुका डॉट कॉम' चा दणका...

अष्टविनायक महामार्गाचे ते गार्डस्टोन अखेर हटवले...?

करडे येथुन रांजणगाव गणपती येथे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गाचे काम चालु असुन या रस्त्याच्या साईड पट्ट्यांच्या मधोमध गार्ड स्टोन रोवण्यात आले होते. हे गार्ड स्टोन नक्की कशासाठी...? अश्या आशयाची बातमी (दि १२) रोजी " शिरुर तालुका डॉट कॉम" मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी सोमवार (दि १३) रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने ते गार्ड स्टोन जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले.

शिंदोडी: करडे येथुन रांजणगाव गणपती येथे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गाचे काम चालु असुन या रस्त्याच्या साईड पट्ट्यांच्या मधोमध गार्ड स्टोन रोवण्यात आले होते. हे गार्ड स्टोन नक्की कशासाठी...? अश्या आशयाची बातमी (दि १२) रोजी " शिरुर तालुका डॉट कॉम" मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीची दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी सोमवार (दि १३) रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने ते गार्ड स्टोन जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहन चालकांनी "शिरुर तालुका डॉट कॉम" चे आभार मानले आहेत.

अष्टविनायक रस्त्याच्या साईडपट्यांच्या मधोमध गार्डस्टोन?

रांजणगाव गणपती येथुन बाभूळसर, करडे येथुन  न्हावरे, इनामगाव, काष्टी मार्गे सिद्धटेक येथे हा अष्टविनायक महामार्ग जातो. करडे ते रांजणगाव गणपती या १२ किमी अंतराच्या रस्त्याचे काम सध्या सुरु असुन या रत्याच्या कामात अनेक त्रुटी आहेत. तसेच अनेक ठिकाणी धोकादायक वळण असुन ओढ्याच्या ठिकाणी बांधलेल्या पुलाचे कठडेसुध्दा कमी उंचीचे आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गंभीर अपघात होण्याचा धोका आहे. त्यामुळे या पुलाच्या कठडयाची उंची वाढवावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच नाव घेऊन दिला दम...

याबाबत करडे येथील जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र जगदाळे (पाटील) म्हणाले या रस्त्यावर गार्डस्टोन लावताना संबंधित ठेकेदाराला मी त्याबाबत कल्पना दिली होती. परंतु त्याने नियमानुसार गार्डस्टोन लावत असल्याचे सांगितले. परंतु रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना गार्डस्टोन दिसतच नसल्याने अपघाताचा धोका आहे. तसेच धोकादायक वळण असलेल्या ठिकाणी गार्डस्टोनला रिफ्लेक्टर लावावेत. आत्तापर्यंत या रस्त्यावर तीन चारचाकी वाहनांचा वळणांचा अंदाज न आल्याने अपघात झालेला असुन सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

जातेगाव खुर्दमध्ये दिसणारा बिबट्या अखेर जेरबंद

Title: Ashtavinayak Mahamargache Te Guardstone Akher Hatavale