आशुतोष केळकर ची अरुंधतीच्या आयुष्यात एन्ट्री...

छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.मालिकेत अरुंधतीचा कॉलेजचा मित्र आल्याने संपूर्ण कथानकाला वेगळं वळण लागताना दिसतंय. आशुतोष केळकर अरुंधतीच्या आयुष्यात आल्यावर तिच्या डोक्यावर असणारा कर्जाचा आणि जबाबदारीचा डोलारा थोडाफार तरी कमी होईल, अशी प्रेक्षकांना आशा आहे.

मुंबई: 'आई कुठे काय करते' छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. मालिकेत नुकत्याच आलेल्या ट्विस्टमुळे मालिका आणखीनच रंजक बनली आहे. मालिकेत अरुंधतीचा कॉलेजचा मित्र आल्याने संपूर्ण कथानकाला वेगळं वळण लागताना दिसतंय. आशुतोष केळकर अरुंधतीच्या आयुष्यात आल्यावर तिच्या डोक्यावर असणारा कर्जाचा आणि जबाबदारीचा डोलारा थोडाफार तरी कमी होईल, अशी प्रेक्षकांना आशा आहे.

धक्कादायक: अल्पवयीन मुलीवर तब्बल ४०० जणांचा बलात्कार

यात अविनाशने घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी अरुंधती तिच्या नावावर असलेलं अर्ध घर गहाण ठेवते. त्यावरुन घरात बराच आकांडतांडव होतो. संजना आणि अनिरुद्ध अरुंधतीला दोष देत तिला व्यवहारातलं काहीही कळत नाही असं म्हणतात. सोबतच अनिरुद्ध अरुंधतीला तिच्या नावावर असणारं घर देखील त्याच्या नावावर करायला सांगतो. दुसरीकडे यश आणि घरातील इतर सदस्य पैसे जमवण्याचा प्रयत्न करतायत. अशातच आशुतोष अरुंधतीसाठी आशेचा किरण बनून येणार आहे. पुढील भागांमध्ये आशुतोष यशचा अपघात होण्यापासून वाचवणार आहे. सोबतच अरुंधतीला त्याच्या संस्थेच्या एका अल्बमसाठी गाण्याची ऑफर देणार आहे.

ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच निधन

या गाण्याचे अरुंधतीला पैसे मिळतील आणि अशी आणखी काही गाणी गाऊन मिळलेल्या पैशातून अरुंधती घर सोडवण्यासाठी मदत करु शकते. परंतु, अरुंधती आशुतोषने दिलेली ही ऑफर स्वीकारणार का, घरातील लोक तिला पाठिंबा देणार का की नेहमीप्रमाणे संजना आणि अनिरुद्ध तिला आडकाठी करणार, अरुंधती तिचं घर कसं सोडवणार, असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र आशुतोषच्या येण्याने प्रेक्षकांमध्ये अरुंधतीच्या मदतीसाठी कुणीतरी आहे अशी खात्री निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Ashutosh Kelkar Chi Arundhatichya Ayushayat Entry