आशुतोषने अरुंधती समोर ठेवला 'हा' प्रस्ताव

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक रंजकदार ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिरुद्धसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एकट्या पडलेल्या अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली आहे.

मुंबई: छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनेक रंजकदार ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अनिरुद्धसोबत घटस्फोट घेतल्यानंतर एकट्या पडलेल्या अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या जुन्या मित्राची एन्ट्री झाली आहे.

शिरुर तालुक्यात विद्युत वितरणकडून थकीत वीजबिल वसुली मोहीम सुरु

आशुतोष केळकर असं तिच्या मित्राचं नाव असून वरचेवर त्याच्या अरुंधतीसोबतच्या भेटी वाढल्या आहेत. ज्यामुळे अनिरुद्ध हवालदिल झाल्याचं पाहायला मिळत आहे. स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोषने अरुंधतीसमोर एक प्रस्ताव ठेवणार आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावामुळे अरुंधतीच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. मात्र, तो प्रस्ताव स्वीकारावा की नाही हा प्रश्न अरुंधतीला पडला आहे.

तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध उपाययोजना राबविणार...

व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये आशुतोष अरुंधतीला त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एक गाणं गाण्याचा प्रस्ताव देणार आहे. मात्र, हा प्रस्ताव ऐकल्यावर घरातील सगळेच जण अचंबित होतात. कारण, अरुंधतीच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट पडणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Ashutoshne Arundhati Samor Thewla Ha Proposal