ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. शिवाय, अभिनेते गोविंदा यांच्या 'जिस देश में गंगा रहता है' चित्रपटातील त्यांनी साकारलेले सन्नाटा हे पात्र विशेष गाजले होते.

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटातील सतत चर्चेत असणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने आज (मंगळवार) निधन झाले आहे.

Actor Kishore Nandlaskar Passes Away Due To COVID19

अभिनेते किशोर यांना करोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले. काही वर्षांपूर्वी किशोर नांदलस्कर यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शारीरिक त्रास सुरू झाले होते. वैद्यकीय तपासांनंतर त्यांची बायपास करण्यात आली होती.

Kishore Nandlaskar - IMDb

अभिनेते किशोर नांदलस्कर मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित 5 व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची नामांकने जाहीर करण्यात आली होती. गेली पन्नासहून अधिक वर्षे विविध भूमिकांच्या माध्यमातून दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ कलाकार किशोर नांदलस्कर यांना 2021 वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.

दरम्यान, किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले.  शिवाय, अभिनेते गोविंदा यांच्या 'जिस देश में गंगा रहता है' चित्रपटातील त्यांनी साकारलेले सन्नाटा हे पात्र विशेष गाजले होते. किशोर नांदलस्कर यांच्या रंगभूमीच्या कारकीर्दिबद्दल बोलायचे झाले तर ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं. तर त्यांच्या ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. चतुरस्त्र नट हरपल्यामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गोविंदा की इस फिल्म में निभाया था 'सन्नाटा' का रोल, इस एक्टर की संपत्ति  जानकर उड़ जाएंगे होश - Entertainment News: Amar Ujala

किशोर नांदलस्कर भोईवाडा-परळ येथे पूर्वी राहात होते. त्यांचे घर छोटे असल्यामुळे ते देवळात झोपायचे. जवळपास दीड वर्षे त्यांनी मंदिराचा आसरा घेतला होता.

Kishore Nandlaskar: Movies, Photos, Videos, News, Biography & Birthday |  eTimes

सरकारी दरबारी फेऱ्या मारूनही नांदलस्कर यांना घर मिळत नव्हते. अखेर त्यांनी एका मंदिरात आसरा घेतला. दिवसा शूटिंग केल्यानंतर रात्री झोपायला भोईवाडा-परळ येथील श्रीराम मंदिरात जात होते. तब्बल दीड वर्षे त्यांनी असे केले आणि एकेदिवशी हे वृत्त एका मराठी वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मंजूर केली आणि अखेर त्यांना हक्काचे घर मिळाले होते.

सिंघम में Ajay Devgn के साथ काम कर चुके Kishore Nandlaskar नहीं रहें,  कोरोना वायरस ने ली जान ! |

गोविंदा की इस फिल्म में निभाया था 'सन्नाटा' का रोल, इस एक्टर की संपत्ति  जानकर उड़ जाएंगे होश - Entertainment News: Amar Ujala

Title: ator kishor nandalskar passes away
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे