आश्चर्य! शेळीने दिला 8 पायांच्या पिल्लाला जन्म, पण...

शेळीनं आठ पायाच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी केली.

नवी दिल्ली: एका शेळीने 8 पाय असणाऱ्या पिल्लाला जन्म दिला आहे. शेळीच्या पिल्लाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, काही वेळातच शेळीच्या पिल्लाचा मृत्यू झाला.

जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी उसळली गर्दी...

सरस्वती मोंडल नावाच्या महिलेकडे असलेल्या शेळीने या अद्भूत पिल्लाला जन्म दिला आहे. शेळीनं आठ पायाच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगात पसरली होती. यानंतर गावातील अनेकांनी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी केली. सध्या या शेळीच्या पिल्लाचे फोटो सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहेत. संबंधित घटना पश्चिम बंगालच्या कालमेघा परिसरातील बनगाव येथील आहे. 

Shocking Video: नाकात साप घालून काढला तोंडातून बाहेर...

बनगाव येथील रहिवासी असणाऱ्या सरस्वती मोंडल यांनी घरी काही गायी आणि शेळींचे पालन केले आहे. दरम्यान, 16 जुलै रोजी मोंडल यांच्या एका शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. त्यातील एक पिल्लू सामन्य होते. दुसऱ्या पिल्लाला 8 पाय होते. दुर्दैव म्हणजे, जन्मानंतर काही मिनिटांतच संबंधित शेळीच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. 

Video: नागाने कोंबडीसह खाल्ली पाच अंडी

पण, शेळीनं आठ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली होती. त्यामुळे गावातील अनेक लोकांनी मोंडल यांच्या घरी शेळीच्या पिल्लाला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यातील काहींनी या शेळीच्या पिल्लाचे फोटो काढले आणि व्हायरल केले. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Video: तुला कापू का विचारल्यावर कोंबडी म्हणाली नको...

Video: बापरे! दारूच्या नशेत युवक भिडला नागाला अन्...

Video: महिला कार चालवत असताना नागाने काढला फणा

Video: खेकडा मारतोय सिगारेटचे झुरक्यावर झुरके

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: baby goat born with 8 leg in west bengal photos went viral o