बारा बलुतेदार महासंघच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भगवान श्रीमंदिलकर

बारा बलुतेदार महासंघच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भगवान श्रीमंदिलकर यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे झालेल्या चिंतन बैठकीत ओबीसी नेते प्रजा लोकशाही परिषद व बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी निवडीची घोषणा केली.

शिरुर: बारा बलुतेदार महासंघच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भगवान श्रीमंदिलकर यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे झालेल्या चिंतन बैठकीत ओबीसी नेते प्रजा लोकशाही परिषद व बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी निवडीची घोषणा केली.

कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना शासनाने मदत द्यावी...

सध्या भगवान श्रीमंदिलकर हे अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पुणे जिल्हा सचिव या पदावर काम करत आहेत. विकास संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कामांची दखल घेऊन अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे व ओबीसी नेते राजा लोकशाही परिषद व बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी त्यांची बारा बलुतेदार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'
   
यावेळी बोलताना नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष भगवान श्रीमंदिरकर म्हणाले की, संघटनेने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून बारा बलुतेदार महासंघाचे  संघटन बांधून प्रत्येक गावात शाखा उघडून महासंघाचे कार्य पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच रोहिणी आयोगा संदर्भात जनजागृती अभियान राबविणार असून ते लागू करण्यासाठी ओबीसीचे नेते बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली व अखिल महाराष्ट्र कुंभार समाज  विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंगलदास बांदल यांची पत्नी व भावाचा जामीन अर्ज फेटाळला...
            
यावेळी राज्यातील १२ बलुतेदार, अलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी असलेल्या वंचित ओबीसिंचा चिंतन मेळावा उस्मानाबाद येथे संपन्न झाला. राज्याचे ओबीसी नेते तथा प्रजा लोकशाही परिषद व बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी आर्गेनाईजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरजी अंसारी यांच्या शुभ हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

ओबीसी समाजास न्याय देणारा आयोग त्वरित लागु करा अन्यथा...

यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेशजी चव्हाण, फकीरा दल प्रमुख सतिषजी कसबे, प्रजा सुराज्य पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दशरथजी राऊत, बारा बलुतेदार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, धनंजयजी शिंगाड़े, राजेंद्रजी बागुल, उत्तमराव सोलाने, रविभाऊ कोरे, मुकुंदजी मेटकर, लक्ष्मणराव माने, बाळासाहेब खोत,अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे, याचिकाकर्ते विकासराव गवळी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रस्ताविक धनंजय शिंगाड़े यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मण माने यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर कोळी यांनी मानले.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Bhagwan Srimandilkar as the State Vice President of Bara Bal