मोठी बातमी! आधी दोन बडे मंत्री पवारांना भेटले अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; वाचा नेमके काय घडले

नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली.

नवी दिल्ली: नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. अनेक राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करत असतानाचा फोटोदेखील ट्विट केला आहे.

...त्यांना उगीच बळीचा बकरा करु नये

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील भेटीमागील घटनाक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. शरद पवार आणि मोदींनी पंतप्रधान कार्यालयात तासभर चर्चा झाली. त्याआधी भाजपच्या २ केंद्रीय मंत्र्यांनी पवारांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पीएमओमध्ये गेले.

May be an image of text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Ant of Speech सूत्रसंचालन संभाषणचातुर्य देहबोली सभाधिटपणा, व्यक्तिमत्व विकास नविन बॅचसाठी प्रवेश सुरु भाषणशास्र लिडरशीप डेव्हलपमेंट गंगाविहार, नगर-पुणे रोड, षटकार कॉलनी, शिरूर, ,जि.पुणे मो.नं. 9860927799 9615927799 ई-मेल: chakrer@gmail.com f भाषण करायला शिका. या पेजवर भेट द्या.'

दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी आंदोलन आणि लडाखमधील सीमावर्ती भागातील चीनच्या हालचाली हे २ मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. विरोधक हे दोन्ही मुद्दे अधिवेशनात लावून धरु शकतात. त्याच अनुषंगाने मोदी-पवारांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्याआधी राज्यसभेच्या सभागृहनेतेपदी निवड झालेले पियूष गोयल यांनीही पवारांची भेट घेतली. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील पवारांची भेट घेत त्यांना लडाख मधील चीनच्या हालचाली आणि भारताची स्थिती याबद्दल माहिती दिली. त्यामुळे संसदेत चीन आणि शेतकरी आंदोलनाचा मुद्दा फारसा चर्चिला जाऊ नये, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे.

लग्नानंतर 3 महिन्यांनी आई बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री...

देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी
भाजपचे केंद्रातले बडे मंत्री शरद पवारांची भेट घेत असताना राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील दिल्लीवारी करुन आले. या दौऱ्या दरम्यान त्यांनी काही नवनियुक्त मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र फडणवीसांच्या दिल्ली भेटीचं टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे. काल फडणवीस दिल्लीत होते. आज सकाळी ते नागपूरला परतले आणि त्यानंतर पवार-मोदींची भेट होते, हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोठे विधान; म्हणाले...

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: Big news Earlier two senior ministers met Pawar and