... म्हणून मी शरद पवार यांच्या विरोधात बोलतो: गोपीचंद पडळकर

दिलीप वळसे पाटलांना माझा सल्ला आहे. सावध राहून काम करा. करण राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाटचाल तुरुंगाच्या दिशेने सुरू आहे.

जुन्नर: जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे झालेल्या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाआघाडीच्या सरकारवर निशाणा साधत अनेक आरोप केले. यासोबत शरद पवार यांच्यावर वारंवार टीका करण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले.

जुन्नर येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांनी नुकताच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याच निमित्ताने सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेच्या बालेकिल्यात पहिली वहिली भाजपची सभा आयोजित केली होती. 

मोठी घोषणा! राज्यातील कॉलेजेस सुरू होण्याचा मुहूर्त ठरला!

यावेळी बोलताना पडळकर म्हणाले, '50 वर्षांत सत्ता पवारांच्या घरात पाणी भरत आहे. मात्र, तरीही पुणे जिल्हातले राष्ट्रवादीचे नेते सांगतात की, आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत. कष्टक-यांचे नेते आहोत. मात्र, ज्या बारामती विधानसभा मतदार संघात यांनी निवडणूक लढवली त्या मतदार संघातल्या 44 गावात शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही. तीच अवस्था जुन्नरमधील अन् पठारावर आहे. ज्या तालुक्यात 5 धरणे आहेत त्या तालुक्यातील जनता आज पाण्यासाठी तहानलेली आहे. याच्यापेक्षा मोठ पाप या पवार कुटुंबियांचं कोणतच असू शकत नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलतो. जर तुमच्या घरात 50 वर्ष सत्ता असेल तर या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी कुणाची?'

...अन्यथा संजय राऊतांना पुण्यात फिरु देणार नाही

'राज्यात दुधाला दर नाही, बैलगाडा शर्यत चालू होत नाही. जनावरांचे बाजार दोन-दोन वर्षे बंद आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाहीत आणि ऐशमध्ये मुंबईत बसतात. जर छपत्रती शिवाजी महाराज आज असते आणि या महाराष्ट्रात सरकारमधील बलात्कारी, भ्रष्टाचारी, जातीयवादी मंत्र्यांना आणि हे सरकार निर्माण करणाऱ्यांना टकमक टोकावरून यांचा कडेलोट केला असता,' असे म्हणत पडळकर यांनी सरकारवर टीका केली.

शिरुर तालुक्यातील त्या शिवसेना मेळावा आयोजकावर गुन्हे दाखल

शिवसेना, राष्ट्रवादी मेळाव्यावर जुन्नर मध्ये गुन्हे मग शिरुरचे काय?

अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरीची मागणीः डॉ. अमोल कोल्हे

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: bjp gopichand padalkar tells reason ncp sharad pawar behind